22.5 C
Latur
Saturday, November 26, 2022
Homeक्रीडारेसलिंगस्टार सारा ली चे निधन

रेसलिंगस्टार सारा ली चे निधन

एकमत ऑनलाईन

वॉशिंग्टन : डब्ल्यू. डब्ल्यू. ई. रेसलिंगस्टार सारा ली हीने वयाच्या अवघ्या ३० व्या वर्षी जगाचा निरोप घेतल्याने तिच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.

सारा ली च्या आईने ही बातमी सोशल मिडियावर व्हायरल केली. त्यानंतर सोशल मिडियावर तिच्या चाहत्यांनी साराच्या मृत्यूवर अनेक प्रश्न विचारले आहेत. साराला सायनसमुळे श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यामुळे ती गेल्या काही दिवसांपासून सातत्याने आजारी पडत होती. साराने अवघ्या ३० वर्षांच्या वयात डब्ल्यू. डब्ल्यू. ई. रेसलिंगच्या अनेक स्पर्धा जिंकत आपला चाहता वर्ग निमार्ण केला होता.

सोशल मिडियावर लाखो चाहते
मजबूत शरीरयष्टी असलेली सारा दिसायलाही सुंदर होती. त्यामुळे अल्पावधीतच साराने डब्ल्यू. डब्ल्यू. ई. रेसलिंगमध्ये आपले नाणे खणखणीत वाजविले होते. साराचे सोशल मिडियावर लाखो चाहते होते. साराने माजी रेसरल वेस्टीन ब्लेकला डेट केल्यानंतर लग्न केले. ती मिशीगन येथे स्थायीक झाली होती.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या