28 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeक्रीडारोहित बाद झाल्याने पत्नी रितिका निराश

रोहित बाद झाल्याने पत्नी रितिका निराश

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : टीम इंडियाने आशिया चषकाच्या सुपर फोरमध्ये प्रवेश केला आहे. कर्णधार रोहित शर्माने केवळ १३ चेंडूत २ चौकार आणि १ षटकारासह २१ धावा केल्या. पाचव्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर रोहित शर्मा लाँग शॉट खेळायला गेला तेव्हा तो झेलबाद झाला.

यानंतर रोहित शर्माची पत्नी रितिकाची प्रतिक्रिया टीव्ही स्क्रीनवर दाखवण्यात आली. रोहित बाद झाल्यानंतर रितिका निराश दिसली आणि तिने चेहरा झाकला. हा फोटो सोशल मीडियावर लगेच व्हायरल झाला. चाहते यावर कमेंट करताना दिसले. एका चाहत्याने त्यावर कमेंट करत लिहिले की, रोहितची कॅप्टनसी जाण्याच्या चिंतेत…टीम इंडियाला सपोर्ट करण्यासाठी रितिका अनेकदा मैदानात हजर असते. आशिया कप सुरू झाला तेव्हा रोहित शर्माचे कुटुंब दुबईत नव्हते, पण पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यानंतर ते येथे आले होते.

दरम्यान दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर बुधवारी झालेल्या सामन्यात रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने हाँगकाँगचा ४० धावांनी पराभव केला. या सामन्यात टीम इंडियाने प्रथम फलंदाजी केली. कर्णधार रोहित शर्माने या सामन्यात चांगली सुरुवात केली, मात्र त्याला मोठी धावसंख्या करता आली नाही. रोहित शर्मा एक मोठा शॉट खेळण्याच्या नादात आऊट झाला. त्यावर पत्नी रितिकाही मैदानात होती आणि तिची रिअ‍ॅक्शन व्हायरल होत आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या