22.1 C
Latur
Monday, August 8, 2022
Homeक्रीडासामन्यापूर्वी धक्का, राहुलला कोरोना

सामन्यापूर्वी धक्का, राहुलला कोरोना

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला वनडे सामना शुक्रवारी सुरु होणार आहे. पण पहिला सामना सुरु होण्यापूर्वीच भारतीय संघाला आता एक मोठा धक्का बसला आहे. भारताचा उपकर्णधार लोकेश राहुलला करोना झाल्याचे आता समोर आले असून तो वेस्ट इंडिजमधील मालिकेला मुकण्याची शक्यता आहे.

बंगळुरू येथील नॅशनल क्रिकेट अकादमीमध्ये नुकत्याच झालेल्या शस्त्रक्रियेनंतर तो बरा झाला होता आणि या आठवड्याच्या अखेरीस तो वेस्ट इंडिजला जाणार होता. राहुलला वेस्ट इंडिज मालिकेसाठी ट्वेन्टी-२० संघात स्थान देण्यात आले होते. पण त्यासाठी त्याला फिटनेस टेस्ट पास करावी लागणार होती. पण आता त्याला करोना झाल्याचे समोर आले असून आता त्याला विलगीकरणामध्ये राहाले लागणार आहे. राहुलला आता पाच दिवस तरी विलगीकरणामध्ये राहावे लागणार आहे. त्यानंतर पुन्हा एकदा त्याची कोरोना चाचणी घेण्यात येणार आहे.

या चाचणीत जर त्याचा अहवाल निगेटिव्ह आला तरच त्याची फिटनेस चाचणी होऊ शकते. त्यानंतर तो जर या चाचणीत पास झाला तरच त्याला वेस्ट इंडिजच्या दौ-यावर जाता येणार आहे. राहुलवर जर्मनीमध्ये स्पोर्टस हर्नियाची यशस्वी शस्त्रक्रिया झाली होती आणि त्यामुळेच त्याला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत खेळता आले नव्हते. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दौ-याला २२ जुलैपासून सुरुवात होणार आहे.

भारत आणि वेस्ट इंडिज यांमध्ये तीन वनडे आणि पाच ट्वेन्टी-२० सामन्यांच्या मालिका खेळवण्यात येणार आहेत. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला वनडे सामना शुक्रवारी २२ जुलैला खेळवण्यात येणार आहे, तर त्यानंतर ट्वेन्टी-२० मालिका २९ जुलै ते सात ऑगस्ट या कालावधीत खेळवण्यात येणार आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दोन ट्वेन्टी-२० सामने हे अमेरिकेत खेळवण्यात येणार आहेत. पण वनडे आणि ट्वेन्टी-२० या सामन्यांच्या वेळा मात्र वेगवेगळ््या असणार आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या