24.4 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeक्रीडा२०० खेळाडूंना टॉयलेटमध्ये वाढले जेवण

२०० खेळाडूंना टॉयलेटमध्ये वाढले जेवण

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : यूपीच्या सहारनपूरमध्ये कबड्डी टूर्नामेंट दरम्यान खेळाडूंना टॉयलेटमध्ये जेवण वाढल्याचा व्हीडीओ समोर आला आहे. सहारनपूर येथे तीन दिवसीय राज्यस्तरीय १७ वर्षांखालील मुलींच्या कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये खेळाडूंचे भोजन तयार करून ते शौचालयात ठेवण्यात आले होते. स्पर्धेत सहभागी झालेल्या सुमारे २०० खेळाडूंना हेच जेवण देण्यात आले. एवढेच नाही तर खेळाडूंना दिलेला भातही अर्धवट शिजवून दिला होता. या संपूर्ण प्रकरणाचा व्हीडीओ सध्या व्हायरल होत आहे.

सहारनपूरच्या डॉ. भीमराव आंबेडकर स्टेडियममधील टॉयलेटमध्ये २०० हून अधिक कबड्डीपटूंचे जेवण तयार करून ठेवण्यात आले होते. याचा एक व्हीडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. शनिवारपासून टॉयलेटच्या फरशीवर ठेवलेल्या राईस प्लेटचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

सहारनपूर जिल्ह्यात तीन दिवसीय राज्यस्तरीय १७ वर्षांखालील मुलींच्या कबड्डी स्पर्धेला सुरुवात झाली आहे. खेळाडूंच्या राहण्याची व भोजनाची व्यवस्था स्टेडियममध्येच करण्यात आली होती. सोशल मीडियावर चित्रे समोर आल्यानंतर, खेळाडूंनी आरोप केला की, स्वीमिंग पूलजवळ भात शिजवला गेला. त्यानंतर तो एका मोठ्या प्लेटमध्ये काढून टॉयलेटच्या फरशीवर ठेवला. भाजी आणि पु-याही तयार करून टॉयलेटमध्ये ठेवल्याचा आरोप त्यांनी केला.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या