लातूर : शूटींग बॉल फेडरेशन ऑफ इंडिया सलग्न राज्य
शूटींग बॉल असोशिएशन महाराष्ट्रद्वारा आयोजित ३५ वी राज्य शुटींग बॉल अजिंक्य पद व निवड चाचणी स्पर्धेत लातूर येथे कै. गोविंदराव गित्ते कनिष्ठ महाविद्यालय, पानगावची ऋतुजा भिमाशंकर उरगुंडे हिची राज्यातून निवड झाली आहे. लातूर येथे सदरील निवड चाचणी स्पर्धा पार पडली. तीत पानगावची ऋतुजा उरगुंडे हीची राज्यस्तरावर शूटींग बॉल स्पर्धेसाठी निवड झाली. ही निवड म्हणजे पानगावच्या नाव लौकिकात शानदार भर आहे.
ही स्पर्धा मार्च- एप्रील २०२२ मध्ये मध्यप्रदेश, राजस्थान येथे पार पडणार आहे. यासाठी तिचे शारीरिक शिक्षक नितीन उकरडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या निवडीचे अंनिसचे जिल्हा प्रधान सचिव बाबा हलकुडे, सुधीर भोसले, ग्राम बाल संरक्षण समिती पानगावचे अध्यक्ष मधुकर गालफाडे, सामाजिक कार्यकर्ते मारुती गालफाडे, सरपंच सुकेश भंडारे, डॉ. सुनील नागरगोजे, कुलभूषण संपत्ते, शिलाताई आचार्य, पार्वती उरगुंडे, वसंत बिराजदार, भिमाशंकर उरगुंडे, अनिता उरगुंडे, प्रकाश उरगुंडे आदींनी अभिनंदन केले आहे.