23.8 C
Latur
Monday, August 15, 2022
Homeक्रीडाएक लाखांहून अधिक लोकांनी एकाच वेळी गायले ‘वंदे मातरम’

एक लाखांहून अधिक लोकांनी एकाच वेळी गायले ‘वंदे मातरम’

एकमत ऑनलाईन

अहमदाबाद : गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स आयपीएल २०२२च्या अंतिम फेरीत नरेंद्र मोदी स्टेडियमवर मेगा फायनलमध्ये आमनेसामने आले. सुमारे १ लाख ३० हजार लोक बसण्याची क्षमता असलेले हे स्टेडियम जगातील सर्वात मोठे स्टेडियम आहे.

बीसीसीआयने या मेगा इव्हेंटचा समारोप सोहळा अहमदाबादमध्ये आयोजित करण्याचा निर्णय घेतला होता. एआर रहमान आणि रणवीर सिंग हे दोन सुपरस्टार समारोप सोहळ्याला उपस्थित होते. रणवीर सिंगने काही अप्रतिम डान्सने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. तर एआर रहमान यांनी आपल्या मधुर आवाजाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.

नरेंद्र मोदी स्टेडियमवर एआर रहमान यांच्या गाण्याचा एक लाखांहून अधिक लोकांनी आनंद लुटला. ‘वंदे मातरम’ गाण्यावर जमाव डोलत होता. जवळपास एक लाख लोकांनी ‘वंदे मातरम’ हे गाणे एकत्र गायले जे भारतीय चाहत्यांसाठी भावनिक आणि नेत्रदीपक दृश्य होते. अशा पद्धतीने ‘वंदे मातरम’ गाण्याची घटना यापूर्वी कधीच घडली नसावी.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या