नवी दिल्ली : भारतीय संघ सध्याच्या घडीला ऑस्ट्रेलियात विश्वचषक खेळत आहे. पण, त्यानंतर भारताचा संघ न्यूझीलंड आणि बांगलादेश या दोन देशांचे दौरे करणार आहे. या मालिकांसाठी सोमवारी बीसीसीआयने संघ जाहीर रोहित शर्मासह विराट कोहलीला विश्रांती देत भारताचे कर्णधारपद हार्दिक पंड्याकडे सुपूर्द केले आहे.
भारतीय संघ न्यूझीलंडमध्ये टी-२० आणि वनडे मालिका खेळणार आहे. तर बांग्लादेशमध्ये भारतीय संघ वनडे आणि कसोटी मालिका खेळणार आहे. बीसीसीआयच्या वरिष्ठ निवड समितीने सोमवारी टिम इंडियाची घोषणा केली. पांड्याकडे बिसीसीआयने कर्णधारपद सोपविण्यामागे अनेक कारणे दडली आहेत. पंड्याने गेल्या काही महिन्यांत स्वत:ला लीडर म्हणून सिद्ध केले आहे. त्याच्यात जबरदस्त नेतृत्वगुण दिसून आले आहेत. अनेक कठीण सामन्यांमध्ये त्याने परिपक्वता दाखवत संघाला सावरले आहे. त्याच्यातील हा नेतृत्वगुण आयपीएल-२०२२ पासून आणखी खुलून आले. आयपीएल-२०२२ मध्ये, त्याने प्रथमच गुजरात टायटन्सचे नेतृत्व करीत संघाला विजय मिळवून दिला आहे. या आयपीएलमध्ये पंड्याचा वेगळा लूक पाहायला मिळाला होता. या दोन्ही देशांच्या मालिकांसाठी संघात उमरान मलिका आणि शाहबाज अहमद या दोघांना संघात संधी देण्यात आली आहे.
न्यूझीलंडविरुद्ध टी-20 साठी भारतीय संघ : हार्दिक पांड्या (कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार), शुभमन गिल, इशान किशन, दीपक हुड्डा, सूर्य कुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, सुंदर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल, मोहम्मद. सिराज, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक.
न्यूझीलंडविरुद्धच्या वनडेसाठी भारतीय संघ : शिखर धवन, ऋषभ पंत, शुभमन गिल, दीपक हुड्डा, सूर्य कुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, डब्ल्यू सुंदर, शार्दुल ठाकूर, शाहबाज अहमद, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, दीपक चहर, कुलदीप सेन, उमरान मलिक.
न्यूझीलंड दौ-याचे वेळापत्रक
पहिला टी २० – १८ नोव्हेंबर
दूसरा टी २० – २० नोव्हेंबर
तिसरा टी २० – २२नोव्हेंबर
पहिली वनडे – २५ नोव्हेंबर
दुसरी वनडे – २७ नोव्हेंबर
तिसरी वनडे – ३० नोव्हेंबर
बांग्लादेशविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, शिखर धवन, विराट कोहली, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, राहुल त्रिपाठी, ऋषभ पंत, इशान किशन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, डब्ल्यू सुंदर, शार्दुल ठाकूर, मोहम्मद. शमी, मोहम्मद. सिराज, दीपक चहर, यश दयाल.
बांग्लादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, केएस भरत, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, शार्दुल ठाकूर, मोहम्मद. शमी, मोहम्मद. सिराज, उमेश यादव.