21.4 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeक्रीडाश्रीलंकन १० खेळाडू बेपत्ता? ; इंग्लंडमध्ये स्थायिक होण्यासाठी सोडला देश

श्रीलंकन १० खेळाडू बेपत्ता? ; इंग्लंडमध्ये स्थायिक होण्यासाठी सोडला देश

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : इंग्लंडमधील बर्गिंगहॅम येथे राष्ट्रकुल स्पर्धा २०२२ चा थरार पार पडला. ११ दिवस चाललेल्या या स्पर्धेत ७२ देशांतील ५ हजारहून अधिक अ‍ॅथलिट सहभागी झाले होते. या स्पर्धेसाठी भारताच्या शेजारील श्रीलंका देशातील देखील खेळाडू आले होते, मात्र राष्ट्रकुल स्पर्धा संपल्यानंतर १० श्रीलंकन खेळाडू बेपत्ता झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामध्ये ९ अ‍ॅथलिट आणि एका मॅनेजरचा समावेश आहे. श्रीलंका सध्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे म्हणूनच हे १० जण आपल्या देशात परतण्यास तयार नाहीत असेही बोलले जात आहे.

दरम्यान, बेपत्ता झालेल्या खेळाडूंना शोधण्यासाठी स्थानिक पोलिस प्रशासन युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. श्रीलंका मागील काही महिन्यांपासून आर्थिक संकटात सापडला आहे. देशातील स्थिती एवढी गंभीर झाली आहे की लोकांना इंधनासाठी ५-६ दिवस रांगेत उभे राहावे लागत आहे.

अशा स्थितीत श्रीलंकेचे नागरिक देश सोडून इतर देशात स्थायिक होत आहेत. राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये ५१ अधिका-यांसह १६१ सदस्यांचा गट श्रीलंकेतून बर्मिंगहॅमला गेला होता. राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये सहभागी होणा-या श्रीलंकेच्या खेळाडूंवरही संकट आले असले, तरी राष्ट्रकुल क्रीडा महासंघ आणि तेथील क्रिकेट मंडळाच्या मदतीने त्यांना बर्मिंगहॅमला जाता आले होते.

आर्थिक संकटामुळे यूएईत आयोजन
श्रीलंकेत सध्याच्या घडीला सर्वकाही आलबेल नसल्याचे चित्र आहे. देशातील नागरिकांना आवश्यक वस्तूंसाठी इतरत्र भटकावे लागत आहे. त्यामुळे आशिया चषक २०२२ चे आयोजन श्रीलंकेत न होता यूएईच्या धरतीवर होणार आहे. आशिया चषकाचे यजमानपद श्रीलंकेने यूएईला सोपवले आहे. टी-२० आशिया चषकाची सुरुवात या महिन्यात २७ ऑगस्टपासून होणार आहे. श्रीलंकेवर ओढवलेल्या आर्थिक संकटामुळे या स्पर्धेचे आयोजन यूएईत होणार आहे.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या