25.6 C
Latur
Wednesday, August 10, 2022
Homeआंतरराष्ट्रीयसात विम्बल्डन विजेती सेरेना विल्यम्स सलग दुस-या वर्षी पहिल्याच फेरीत बाद

सात विम्बल्डन विजेती सेरेना विल्यम्स सलग दुस-या वर्षी पहिल्याच फेरीत बाद

एकमत ऑनलाईन

लंडन : तब्बल सातवेळा विम्बल्डन आपल्या नावावर करणारी अमेरिकेची स्टार टेनिसपटू सेरेना विल्यम्सला सलग दुस-या वर्षी पहिल्याच फेरीत बाद झाली. मंगळवारी सेंटर कोर्टवर रात्री उशिरा झालेल्या सामन्यात फ्रेंचच्या पदार्पण करणा-या हार्मोनी टानने सेरेना विल्यम्सचा पराभव करत तिला गाशा गुंडाळायला लावला.

गेल्या वर्षी सेरेना विल्यम्सला विम्बल्डनमधून दुखापतीमुळे सामना अर्धवट सोडून माघार घ्यावी लागली होती. त्यावेळीच ही तिचीविम्बल्डनमधील शेवटची मॅच ठरते का अशी शंका उपस्थित केली जात होती.

 

मात्र तिने पुनरागमन केले परंतु पहिल्याच फेरीत ११५ व्या रँकवर असणा-या टानने तिला ७-५, १-६, ७-६(७) असा पराभवाचा धक्का दिला. विशेष म्हणजे हार्मोनी टान ही यापूर्वी ंिवबल्डनचा मेन ड्रॉ कधीही खेळली नव्हती.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या