24.8 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeक्रीडायूएस ओपन जिंकून १९ वर्षीय कार्लोस अल्कराझने रचला इतिहास

यूएस ओपन जिंकून १९ वर्षीय कार्लोस अल्कराझने रचला इतिहास

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : : १९ वर्षीय कार्लोस अल्कराझने कॅस्पर रुडचा पराभव करून यूएस ओपन टेनिस स्पर्धेत पहिले ग्रँड स्लॅम जेतेपद पटकावले. यासह वयाच्या १९ व्या वर्षी जेतेपद जिंकणारा तो सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. यूएस ओपनला ३२ वर्षांनंतर सर्वात तरुण चॅम्पियन मिळाला आहे. कार्लोसने यूएस ओपनच्या अंतिम फेरीत नॉर्वेच्या कॅस्पर रुडचा ६-४, २-६, ७-६(१), ६-३ असा पराभव करून त्याचे पहिले ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावले.

कार्लोस अल्कराझने सामना जिंकताच पडून चेह-यावर हात ठेवला. यानंतर त्याने रुडला मिठी मारली. न्यूयॉर्कमधील दोन आठवड्यांच्या स्पर्धेत आपल्या अ‍ॅक्रोबॅटिक शॉटने आणि उत्कटतेने चाहत्यांना मंत्रमुग्ध करणा-या अल्कारेझने रशियाच्या डॅनिल मेदवेदेवच्या जागी प्रथम क्रमांक पटकावला आहे.

स्पेनचा युवा टेनिसस्टार कार्लोस अल्कराझ आणि नॉर्वेचा कॅस्पर रुड यूएस ओपनच्या अंतिम फेरीत पोहोचला. तो टेनिस क्रमवारीतील अव्वल स्थान मिळवणारा सर्वात लहान खेळाडू ठरला आहे. ऑस्ट्रेलियाच्या लेटॉन हेविटने २००१ मध्ये २० वर्षी अव्वल क्रमांक मिळवण्याचा विक्रम केला होता. तियाफोच्या रुपाने अमेरिकेला घरच्या कोर्टवर विजेतेपद मिळवण्याची संधी होती.

तसे झाले असते तर तो अँडी रॉडिकनंतर यूएस ओपन ंिजकणारा पहिला अमेरिकन टेनिसपटू ठरला होता. रॉडिकने २००३ मध्ये ही यशस्वी कामगिरी केली होती. तियाफो हा फ्लुशिंग मेडोव्सनंतर यूएस ओपनची उपांत्य फेरी गाठणारा पहिला कृष्णवर्णीय अमेरिकन ठरला.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या