23.8 C
Latur
Friday, September 24, 2021
Homeक्रीडाआयपीएल स्पर्धेच्या दुस-या टप्प्याअगोदर ३ संघांना धक्का

आयपीएल स्पर्धेच्या दुस-या टप्प्याअगोदर ३ संघांना धक्का

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : भारत-इंग्लंड कसोटी मालिकेनंतर आता सर्वांना आयपीएलचे वेध लागले आहेत. आयपीएल २०२१ चा दुसरा टप्पा यूएईत आयोजित करण्यात आला आहे. आयपीएलमध्ये कोरोनाने शिरकाव केल्यानंतर यंदाचा हंगाम अर्ध्यातच थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर आता १९ सप्टेंबरपासून आयपीएल २०२१ ला सुरुवात होत आहे. मात्र, आता कसोटी न खेळवली गेल्याने इंग्लंडचे क्रिकेटपटू नाराज आहेत. तसेच अनेक खेळाडू आयपीएलच्या दुस-या टप्प्यामधून बाहेर पडत आहेत. याचा फटका जवळपास तीन संघांना बसणार आहे.

यूकेमधून यूएईला येणा-या प्रत्येक खेळाडूला संघात सामील होण्यापूर्वी ६ दिवसांच्या क्वारंटाइन कालावधीत राहावे लागेल, असे बीसीसीआयने सांगितले. इंग्लंडला गेलेले सर्व भारतीय खेळाडू बायो बबलमध्ये सामील होण्यापूर्वी क्वारंटाइन असतील. अशातच आता इंग्रजी माध्यमांच्या अहवालांनुसार जॉनी बेअरस्टो, डेविड मलान आणि ख्रिस वोक्स यांनी आयपीएलच्या दुस-या टप्प्यात न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. मलन पंजाब किंग्जकडून खेळतो, तर बेअरस्टो आणि वोक्स हे सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्सकडून खेळतात. मलनच्या जागी पंजाब किंग्सने दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज एडीन मार्करमला संधी देण्याचे ठरवले आहे.

भारताविरुद्ध खेळलेल्या कसोटी संघामधून फक्त मोईन अली आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळण्याची शक्यता आहे. चेन्नईचा स्टार गोलंदाज सॅम करनबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. आयपीएल संपल्यानंतर इंग्लंडचा संघ १७ ऑक्टोबरपासून सुरू होणारा आगामी आयसीसी टी-२० विश्वचषक खेळणार आहे.

जोस बटलर, जोफ्रा आर्चर आणि बेन स्टोक्सदेखील आयपीएलच्या दुस-या टप्प्यामध्ये सहभागी होणार नाहीत. यामुळे राजस्थान रॉयल्सच्या तयारीला मोठा धक्का बसला आहे. जोस बटलर वैयक्तिक कारणांमुळे स्पर्धेत सहभागी झालेला नाही. दुसरीकडे स्टोक्सने मानसिक आरोग्याचा हवाला देत क्रिकेटमधून अनिश्चित काळासाठी विश्रांती घेतली आहे. जोफ्रा आर्चर दुखापतीतून सावरत आहे. त्यामुळे अनेक आघाडीचे खेळाडू दुस-या टप्प्यात दिसणार नाहीत.

 

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या