नवी दिल्ली : सध्या जगात कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे सर्व क्रीडा सामन्यांचे आयोजन हे नियमांचे काटेकोर पालन करून केले जात आहेत. त्यापैकी काही ठिकाणी हे सामने बंद दरवाज्या मागे पार पडत आहेत. त्याचबरोबर काही देशात ५० टक्के लोकांच्या उपस्थितीत सामने पार पडत आहेत. मात्र भारतात देशांतर्गत क्रिकेटला जानेवारीला सय्यद मुश्ताक अली स्पर्धेने सुरुवात होणार आहे.
कोरोनाच्या विश्रांतीनंतर भारतात सय्यद मुश्ताक अली स्पर्धेने देशांतर्गत क्रिकेटला सुरुवात होणार आहे. मात्र ही स्पर्धा प्रेक्षकांविना रिकाम्या स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. आता क्रीडा मंत्रालयाच्या सूचनेनुसार भारतात ५० टक्के लोकांच्या उपस्थित सामने पार पाडण्याची परवानगी देण्यात आली आहे. हे विशेषकरून बीसीसीआयसाठी खूप मोठी बातमी आहे. कारण बीसीसीआय आयपीएलच्या चौदाव्या हंगामाची तयारी करत आहे.
त्याचबरोबर आयपीएल स्पर्धेच्या अगोदर इंग्लंड देशाचा संघ भारताच्या दौ-यावर येणार आहे. या दौ-यातील सामने पुणे, अहमदाबाद आणि चेन्नई या ठिकाणी खेळले जाणार आहे. त्यामुळे हे सामने पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रेक्षक मैदानावर गर्दी करताना दिसून येऊ शकतात. क्रीडा मंत्रालयाच्या नवीन सूचनेनुसार स्पर्धा आयोजक समितीला या सर्व स्पर्धेवर लक्ष ठेवण्यासाठी एक कोविड-१९ टास्क फोर्सची नियुक्ती करावी लागणार आहे.
इनसाइडस्पोर्टच्या माहितीनुसार आयपीएल गव्हर्निंग कौन्सिल आणि बीसीसीआय यांना प्रेक्षकांना स्टेडियममध्ये पुन्हा प्रवेश देण्यासाठी दिशानिर्देशांचे पालन करावे लागेल.
१)क्रीडा आयोजनात प्रेक्षकांचा प्रवेश गृह मंत्रालयाने घालून दिलेल्या दिशा निर्देशानुसार होईल.
2) खुल्या स्पर्धांसाठी, स्टेडियममध्ये एकूण क्षमतेच्या 50% प्रेक्षकांना येण्यासाठी परवानगी दिली जाईल.
3) आत आणि बाहेर जाण्याच्या दरवाजे तसेच बसण्याच्या ठिकाणी जास्त गर्दीची माहिती घेण्यासाठी सीसीटीव्ही उपलब्ध असायला हवे.
स्थानिक प्रशासनानची परवानगी आवश्यक
सरकारने प्रेक्षकांना स्टेडियममध्ये येण्यासाठी परवानगी दिली. आहे. मात्र स्पर्धा आयोजित करर्णाया समितीला स्थानिक प्रशासनाची परवानगी घेणे आवश्यक आहे. आयपीएल बाबतीत सुद्धा बीसीसीआयला स्थानिक प्रशासनाची परवानगी घ्यावी लागेल. हे नियम भारत आणि इंग्लंड यांच्यातील मालिकेसाठी सुद्धा लागू आहेत. फेब्रुवारी महिन्यात इंग्लंड भारताच्या र्दौयावर येणार आहे. त्यावेळी भारतात ४ कसोटी, ५ टी-२० आणि ३ वनडे सामने खेळले जाणार आहेत. या मालिकेच्या दृष्टीने प्रेक्षकांना मैदानात येण्याची परवानगी मिळणे, बीसीसीआयसाठी लाभदायक आहे.
सीबीआयही मुंबई पोलिसांप्रमाणेच निष्कर्ष काढेल