16.8 C
Latur
Thursday, December 1, 2022
Homeक्रीडामुंबई इंडियन्समध्ये ७ खेळाडू कायम

मुंबई इंडियन्समध्ये ७ खेळाडू कायम

एकमत ऑनलाईन

लकी खेळाडूची एन्ट्री, आयपीएल लढतीसाठी बांधणी
मुंबई : मुंबई इंडियन्सच्या संघाने पुढची आयपीएल जिंकण्यासाठी जोरदार हालचाली सुरु केल्या आहेत. मुंबईच्या संघाने आता काही खेळाडूंना संघातून काढण्याचा निर्णय घेतला आहे, तर सात खेळाडू त्यांनी कायम ठेवले आहेत. पण आता मुंबईच्या संघात आता एका लकी खेळाडूची एंट्री झाली आहे.

मुंबई इंडियन्सवर गेल्या मोसमात नामुष्कीची वेळ आली होती. कारण गेल्या हंगामात मुंबई इंडियन्सचा संघ हा सर्वात पहिल्यांदा स्पर्धेच्या बाहेर पडला होता. त्यामुळे मुंबईच्या संघाला ट्रोलही करण्यात आले होते. पण हा पराभव आता मुंबई इंडियन्सच्या संघाने मागे टाकला आहे. कारण आता पुढच्या हंगामासाठी मुंबई इंडियन्सच्या संघाने जोरदार तयारी करायला सुरुवात केली आहे. आपल्या संघाच्या दोन जेतेपदांमध्ये सहभागी असलेल्या खेळाडूला आता त्यांनी संघात पुन्हा एकदा स्थान देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

मुंबई इंडियन्सने जेव्हा २०१८ आणि २०१९ साली आयपीएलचे जेतेपद पटकावले होते. तेव्हा मुंबई इंडियन्सच्या संघात एक वेगवान गोलंदाज होता. पण या जेतेपदानंतर त्याला आरसीबीने मुंबईच्या संघातून आपल्याकडे घेतले होते. पण मुंबईच्या संघाने आता आरसीबीकडून पुन्हा एकदा हा खेळाडू आपल्या ताफ्यात दाखल केला आहे. मुंबई इंडियन्सने याबाबतची अधिकृत माहितीही दिली आहे. त्यामुळे आता आयपीएल २०२३ साठी मुंबई इंडियन्सच्या संघात ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जेसन बेहरेनडॉर्फला स्थान देण्यात आले आहे. मुंबईसाठी जेसन हा २०१८ आणि २०१९ जेतेपदांमध्ये लकी ठरला होता, असे म्हटले जात आहे. त्यामुळे मुंबईच्या संघाने पुन्हा एकदा जेसनला आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले आहे. त्यामुळे आता जेसन कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.

पोलार्ड, एलन, अर्जुन तेंडुलकरला वगळले
किरॉन पोलार्ड, फॅब एलन आणि टायमल मिल्स यांची नावे जाहीर झाली असली तरी याशिवाय अनमोलप्रीत सिंग, मोहम्मद अर्शद खान, मयंक मार्कंडेय, संजय यादव, रमणदीप सिंग, अर्जुन तेंडुलकर, आर्यन जुयाल, आकाश मधवाल, राहुल बुद्धी आणि मुरुगन अश्विन यांची नावे प्रसिद्ध झाली नाहीत, पण त्यांच्या या यादीत समावेश असल्याचे म्हटले जात आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या