34.3 C
Latur
Tuesday, April 20, 2021
Homeक्रीडावानखेडे स्टेडियमच्या ८ कर्मचा-यांना लागण

वानखेडे स्टेडियमच्या ८ कर्मचा-यांना लागण

एकमत ऑनलाईन

मुंबई : आयपीएलच्या १४ व्या मोसमातील रणसंग्राम येत्या ९ एप्रिलपासून सुरू होत आहे. सगळ्या संघाचे ट्रेनिंग कॅम्प सुरू आहेत. संघ व्यवस्थापन आणि मार्गदर्शक मंडळ प्रतिस्पर्धी संघाला कशी मात द्यायची यासंबंधी रणनीती आखण्यात व्यस्त आहे. अशातच वानखेडे स्टेडियममधून मोठी बातमी समोर येतीय. वानखेडे स्टेडियमवरच्या ८ कर्मचा-यांना कोरोनाची लागण झाली असल्याचे समोर आले आहे़ वानखेडे मैदानावर आयपीएलच्या काही मॅचेस खेळवण्यात येणार आहेत. त्याअगोदर ही धक्कादायक बातमी समोर आली आहे.

आयपीएलचा रणसंग्राम येत्या ९ एप्रिलपासून सुरू होत आहे. वानखेडे स्टेडियमवरही आयपीएलच्या काही सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. १० ते २५ एप्रिलपर्यंतच्या जवळपास १० मॅचेस वानखेडे मैदानावर होणार आहेत. स्पोर्टस् स्टारच्या वृत्तानुसार, मैदानावरच्या १९ कर्मचा-यांची आरटीपीसीआर कोरोना टेस्ट करण्यात आली. त्यापैकी ८ कर्मचा-यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

१० तारखेला पहिली मॅच
मुंबईतील वानखेडे मैदानावर १० एप्रिल रोजी पहिला सामना खेळवण्यात येणार आहे. चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात ही लढत खेळवण्यात येणार आहे. याच मॅचची तयारी सध्या वानखेडेवर जोरदारपणे सुरू होती. परंतु अशातच हे वृत्त समोर आल्यानंतर एकच खळबळ माजली आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशन या सगळ्या प्रकरणात जातीने लक्ष ठेवून आहे.

विदर्भात सूर्याचे आग ओकणे सुरूच

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,478FansLike
169FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या