29.2 C
Latur
Sunday, February 28, 2021
Home क्रीडा रणजी ट्रॉफीची ८७ वर्षांची परंपरा खंडित

रणजी ट्रॉफीची ८७ वर्षांची परंपरा खंडित

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक बोर्डाने (बीसीसीआय) देशातील सर्वांत मोठी स्पर्धा असलेली रणजी ट्रॉफी स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयचे सचिव सचिन जय शहा यांनी पत्राद्वारे याबाबतची माहिती सर्व राज्य संघटनांना कळवली आहे. रणजी ट्रॉफीच्या दरम्यान मॅच फीसच्या रूपात दररोज ४५ हजार रुपये कमावणा-या खेळाडूंना नुकसानभरपाई देण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे,

तब्बल ८७ वर्षांनंतर पहिल्यांदाच रणजी ट्रॉफी स्पर्धा रद्द करण्यात आली आहे. मात्र महिलांच्या क्रिकेट हंगामाला मार्चमध्ये प्रारंभ करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. कोरोनाच्या साथीमुळे देशांतर्गत क्रिकेट हंगाम यंदा दिरंगाईने सुरू झाला आहे. सहा जैव-सुरक्षित केंद्रांवर सध्या सय्यद मुश्ताक अली ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धा सुरू आहे. रणजी करंडक स्पर्धेबाबत बैठकीत निर्णय होण्याची शक्यता होती. परंतु याबाबत योग्य तोडगा निघू शकला नाही. बीसीसीआय चा अध्यक्ष सौरव गांगुलीसुद्धा रणजी स्पर्धेसाठी आग्रही होता. पण अखेर रणजी स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या सय्यद मुश्ताक अली ट्वेन्टी-२० स्पर्धा सुरू आहे. ही स्पर्धा झाल्यानंतर विजय हजारे ट्रॉफी स्पर्धा घेण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे. रणजी ट्रॉफी स्पर्धेत चार दिवसांच्या लढती असतात. विजय हजारे ट्रॉफीमध्ये एक दिवसाच्या लढती असतात. देशातील सहा मुख्य शहरांमध्ये मुश्ताक अली स्पर्धेच्या धर्तीवर विजय हजारे स्पर्धा देखील खेळवली जाणार आहे. या स्पर्धेचे वेळापत्रक पुढच्या आठवड्यात अंतिम करण्यात येईल.

…म्हणून रद्द केली मोठी रणजी ट्रॉफी स्पर्धा
भारतीय क्रिकेटपटू घडवणारी सर्वांत मोठी स्पर्धा असलेली रणजी ट्रॉफी स्पर्धा घेण्यासाठी बीसीसीआयकडे पुरेसा वेळ नसल्याचे सांगण्यात येत आहे. तर दोन महिन्यांच्या बायो बबलमुळे रणजी करंडक स्पर्धा खेळवणे कोरोनाच्या सद्यस्थितीत अवघड आहे. त्यामुळे मर्यादित षटकांचे अधिक सामने खेळवण्याचा बीसीसीआयचा प्रयत्न आहे. या स्पर्धांमधून प्रत्येक खेळाडूला प्रति सामना किमान १.५ लाख रुपये मिळतात. इंडियन प्रीमियर लीग मार्च महिन्याच्या शेवटी सुरू होण्याची शक्यता असल्याने या स्पर्धेतील खेळाडूंना आयपीएलसाठी हजर रहावे लागणार आहे.

ताजमहालजवळची झाडे कापण्यास परवानगी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,438FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या