27.4 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeक्रीडापाकिस्तानला मोठा धक्का शाहीन आफ्रिदी बाहेर?

पाकिस्तानला मोठा धक्का शाहीन आफ्रिदी बाहेर?

एकमत ऑनलाईन

कराची : आशिया चषक २०२२ यूएईमध्ये २७ ऑगस्टपासून सुरू होत आहे. २८ ऑगस्ट रोजी भारताचा पहिला सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होणार आहे. टीम इंडियाने या सामन्यासाठी तयारी केली आहे, मात्र या सामन्यात पाकिस्तानला मोठा धक्का बसू शकतो. पाकिस्तानचा स्टार वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीच्या खेळावर साशंकता कायम आहे. शाहीन आफ्रिदीला नुकतेच श्रीलंका दौ-यावरील पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान दुखापत झाली होती. त्यानंतर तो दुसरा कसोटी सामना खेळू शकला नाही, परंतु तरीही त्याचा आशिया चषकाच्या संघात समावेश करण्यात आला आहे.

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने शाहीन आफ्रिदीच्या प्रकृतीबाबत मोठा खुलासा केला आहे. तो म्हणाला की, शाहीन आफ्रिदीला नेदरलँड्सला नेले जाईल, जेणेकरून त्याला डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवता येईल. तंदुरुस्त असल्यास नेदरलँड दौ-यावरही खेळू शकतो, असे कर्णधार बाबरने सांगितले. आशिया चषकापूर्वी पाकिस्तानचा संघ नेदरलँड्सच्या दौ-यावर जाणार आहे.

आशिया चषकापूर्वी शाहीन आफ्रिदी तंदुरुस्त व्हावा असे पाकिस्तानच्या संघाला आवडेल, कारण पाकिस्तानचा पहिला सामना भारताविरुद्ध २८ ऑगस्टला खेळायचा आहे आणि शाहीन आफ्रिदीने भारताविरुद्ध चांगली कामगिरी केली आहे. २०२१ च्या टी-२० विश्वचषकात शाहीन आफ्रिदीने भारताच्या टॉप ऑर्डरला के. एल. राहुल आणि विराट कोहलीला आऊट केले होते.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या