22.1 C
Latur
Sunday, August 14, 2022
Homeक्रीडामानसिक स्वास्थ्यासाठी ब्रेक आवश्यक - स्टोक्स

मानसिक स्वास्थ्यासाठी ब्रेक आवश्यक – स्टोक्स

एकमत ऑनलाईन

डरहम : इंग्लंडचा कसोटी कर्णधार बेन स्टोक्सने अचानक वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. स्टोक्सने आपण सततच्या क्रिकेटला कंटाळलो असल्याने निवृत्तीचा निर्णय घेतल्याचे सांगितले.
बेन स्टोक्स म्हणाला की, ‘आम्ही काही गाड्या नाही. तुम्ही इंधन भरलं आणि खेळण्यास सज्ज झालोत. तुम्ही कसोटी मालिका खेळता त्याच दरम्यान, वनडे संघाची मालिका सुरू असते.

हा वेडपटपणा आहे.’ स्टोक्सने एप्रिल महिन्यात इंग्लंडच्या कसोटी संघाचे नेतृत्व आपल्या खांद्यावर घेतले होते. तो नुकताच दुखापतीतून सावरला आहे. त्याने काही काळ क्रिकेटमधून मानसिक स्वास्थ्यासाठी ब्रेक घेतला होता.
स्टोक्स म्हणाला की, ‘मला असे वाटते की सध्या जे क्रिकेटचे तीनही फॉरमॅट खेळत आहेत त्यांच्यासाठी क्रिकेटचा अतिरेक होत आहे. आता क्रिकेट खेळणे आधीपेक्षा जास्त कठीण झाले आहे. मी आधी तीनही क्रिकेट प्रकार खेळत होतो. त्यावेळी क्रिकेटचा अतिरेक होत होता असे वाटत नव्हते.’

आयसीसी प्रत्येक वर्षी निदान एक आंतरराष्ट्रीय स्पर्धा आयोजित करू इच्छिते. दरम्यान फ्रेंचायजी क्रिकेटचा आवाका देखील मोठा होत आहे. त्यामुळे खेळाडूंवरचा कामाचा ताण दिवसेंदिवस वाढतच आहे.

याबाबत बेन स्टोक्स म्हणतो, ‘जेवढे जास्त क्रिकेट खेळले जाईल तेवढे खेळासाठी चांगले आहे. मात्र तुम्हाला उच्च दर्जाची वस्तू हवी आहे. तुम्हाला चांगले खेळाडू कायम जास्ती जास्त क्रिकेट खेळलेले हवे आहेत. हा माझा आणि तुमचा प्रश्न नाही. तुम्ही जगभर पाहिले तर संघ काही खेळाडूंना विश्रांती देत आहेत जेणेकरून त्यांना वाटावे की त्यांनी ब्रेक घेतला आहे.’

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या