कराची : कराची येथे खेळल्या गेलेल्या तिस-या कसोटीत इंग्लंडने पाकिस्तानचा आठ विकेट्स राखून पराभव केला. या विजयासह इंग्लंडच्या संघाने तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत पाकिस्तानचा क्लीन स्वीप केला. इंग्लंडने रावळपिंडीत खेळला गेलेला पहिला कसोटी सामना ७४ धावांनी जिंकला.
त्यानंतर दुस-या कसोटी सामन्यातही पाकिस्तानला २६ धावांनी धूळ चारत मालिकेवर कब्जा केला. इंग्लंडने कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच पाकिस्तानचा क्लीन स्वीप केला. याशिवाय, पाकिस्तानच्या संघाला घरच्या मैदानावर पहिल्यांदाच कसोटी मालिकेत क्लीन स्वीप मिळाला आहे.
तिस-या कसोटीत प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने पहिल्या डावात ३०४ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात इंग्लंडने ३५४ धावा केल्या आणि ५० धावांची आघाडी घेतली. दुस-या डावात पाकिस्तानने २१६ धावा केल्या आणि इंग्लंडसमोर १६७ धावांचे लक्ष्य ठेवले होते. पाकिस्तानकडून मिळालेले लक्ष्य इंग्लंडच्या संघाने आठ विकेट्स राखून पूर्ण केले.