22.4 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeक्रीडाऑस्ट्रेलिया दौ-यापूर्वी भारताला धक्का

ऑस्ट्रेलिया दौ-यापूर्वी भारताला धक्का

एकमत ऑनलाईन

मोहमद शमी संघाबाहेर
नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका सुरु होण्यापूर्वीच भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. कारण या मालिकेतून आता भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी हा संघाबाहेर गेला आहे. ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी शमीची भारताच्या पंधरा सदस्यीय संघात निवड झाली नव्हती. पण त्याला राखीव खेळाडूंमध्ये ठेवण्यात आले होते. पण आता शमी ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियाला जाणार की नाही, याबाबतचा निर्णय बीसीसीआयला घ्यावा लागणार आहे.

मोहम्मद शमी हा कोरोना पॉझिटीव्ह आल्याचे समोर आले आहे. त्यामुळे तो आता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेत खेळू शकणार नाही. क्रिकबझ या संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार अनुभवी वेगवान गोलंदाज पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यासाठी मोहालीला पोहोचू शकणार नाही. कारण त्याला कोरोना झाला असून त्यावर त्याला उपचार घ्यावे लागणार आहेत. बीसीसीआयकडून (भारतीय क्रिकेट नियामक मंडळ) अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. तथापि, ऑस्ट्रेलिया मालिकेनंतर लगेच खेळल्या जाणा-­या भारताच्या दक्षिण आफ्रिका दौ-यात ३२ वर्षीय शमी खेळण्याची दाट शक्यता आहे. शमीला आता विलगीकरणात ठेवण्यात येईल आणि त्याच्यावर उपचार केले जातील. त्यानंतर शमीच्या तीन कोरोना चाचण्या घेण्यात येतील. या चाचण्यांचा अहवाल जर निगेटिव्ह आला तरच त्याला भारतीय संघाबरोबर खेळता येऊ शकते.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या