24.4 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeक्रीडाअ‍ॅरॉन फिंच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त

अ‍ॅरॉन फिंच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : आस्ट्रेलियाचा मर्यादित षटकांच्या संघाचा कर्णधार अ‍ॅरॉन फिंचने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझिलंड यांच्यात रविवारी (११ सप्टेंबर) होणारा तिसरा एकदिवसीय सामना अ‍ॅरॉन फिंचच्या एकदिवसीय कारकीर्दीतील अखेरचा सामना असेल. अ‍ॅरॉन फिंचला दीर्घकाळापासून खराब फॉर्मचा सामना करत आहे. त्याला मागच्या ७ डावांत फक्त २६ धावा करता आल्या. फिंचने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी तो आगामी टी-२० विश्वचषकात ऑस्ट्रेलियाच्या संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे.

अ‍ॅरॉन फिंचने २०१३ मध्ये आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. अ‍ॅरॉन फिंचने त्याच्या आंतरराष्ट्रीय एकदिवसीय कारकीर्दीत आतापर्यंत एकूण १४५ सामन्यांत ऑस्ट्रेलियाच्या संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. ज्यात त्याने ३९.१४ च्या सरासरीने ५ हजार ४०१ धावा केल्या आहेत. ज्यात १७ शतकांचा सामावेश आहे. तसेच ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग, मार्क वॉ आणि डेव्हिड वॉर्नर यांच्यानंतर ऑस्ट्रेलियासाठी सर्वाधिक शतके झळकावणारा फलंदाजही आहे.

ऑस्ट्रेलियाकडून एकदिवसीय क्रिकेटमध्ये रिकी पाँटिंगने सर्वाधिक २९ वेळा शतक ठोकले आहे. तर, डेव्हिड वॉर्नर आणि मार्क वॉ यांच्या नावावर प्रत्येकी १८-१८ शतकांची नोंद आहे. फिंच रविवारी केर्न्समधील काजलिस स्टेडियमवर त्याच्या एकदिवसीय कारकीर्दीतील १४६वा आणि अखेरचा एकदिवसीय सामना खेळणार आहे. तर, कर्णधार म्हणून हा त्याचा ५४ वा एकदिवसीय सामना असेल.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या