26.6 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeक्रीडाअचिंता शेउलीला वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्णपदक; भारताकडे आतापर्यंत सहा पदक

अचिंता शेउलीला वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्णपदक; भारताकडे आतापर्यंत सहा पदक

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या २०२२च्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय वेटलिफ्टर अचिंता शेउलीने आश्चर्यकारक कामगिरी केली. त्याने वेटलिफ्टंगमध्ये ३१३ किलो वजन उचलून सुवर्णपदक जिंकले. अचिंताने पहिल्या स्रॅच फेरीत १३७ किलो वजन उचलले.

दुस-या लिफ्टमध्ये त्याने १३९ किलो वजन उचलले. यानंतर अचिंताने तिस-या लिफ्टमध्ये १४३ किलो वजन उचलले. अशाप्रकारे त्याने स्रॅचमध्ये १४३ किलो वजन उचलले. २०२२ च्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा अचिंता शेउली हा भारतातील तिसरा अ‍ॅथलीट आहे. त्याने वेटलिफ्टंगमध्ये सुवर्णपदक पटकावले.

सुवर्णपदकासाठी चुरशीची स्पर्धा
क्लीन अँड जर्कमध्ये अचिंताचा सामना मलेशियाच्या मोहम्मदविरुद्ध होता. सुवर्णपदकासाठी दोघांमध्ये चुरशीची स्पर्धा होती. पहिल्या क्लीन अँड जर्क प्रयत्नात १७० अचिंतला १७० किलो वजन उचलता आले नाही. मात्र, त्यानंतर दुस-या प्रयत्नात त्याने १७० किलो वजन उचलले. अशाप्रकारे त्याने ३१३ किलो वजन उचलून सुवर्णपदक जिंकले. २०२२ च्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताचे हे तिसरे गोल्ड मेडल आहे. विशेष म्हणजे सर्व गोल्ड मेडल्स वेटलिफ्टिंगमध्ये आले आहे.

सुवर्णपदक जिंकणारा दुसरा पुरुष खेळाडू
याआधी रविवारी जेरेमी लालरिनुंगाने वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला. बर्मिंगहॅम २०२२ कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकणारा तो भारतातील पहिला पुरुष खेळाडू ठरला. त्याचबरोबर अचिंता सुवर्णपदक जिंकणारा दुसरा पुरुष खेळाडू ठरला आहे. २०२२ च्या राष्ट्रकुल स्पर्धेत आतापर्यंत भारताला सहा पदके मिळाली असून सर्व पदके वेटलिफ्टिंगमध्ये आली आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या