19.2 C
Latur
Wednesday, February 8, 2023
Homeक्रीडाहिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत खेळणा-या महाराष्ट्राच्या पैलवानांवर कारवाई होणार

हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत खेळणा-या महाराष्ट्राच्या पैलवानांवर कारवाई होणार

एकमत ऑनलाईन

मुंबई : हिंदकेसरी कुस्तीसाठी महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या अस्थायी समितीने महाराष्ट्रातील मल्लांना इशारा दिला आहे. हिंदकेसरी खेळणा-या पैलवानांवर कारवाई केली जाणार आहे. यासंदर्भात समितीने पत्रदेखील जाहीर केले आहे. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष संजय कुमार सिंह यांनी पत्र जाहीर केले आहे.

भारतीय शैली कुस्ती महासंघाने दिनांक ५ जानेवारी ते ८ जानेवारी दरम्यान हैदराबाद, तेलंगणा येथे अखिल भारतीय ५१ वी हिंदकेसरी कुस्ती स्पर्धा-२०२३ आयोजित केलेली आहे.

या स्पर्धेमध्ये जर महाराष्ट्रातले पैलवान खेळले किंवा पंच तसेच पदाधिकारी तर महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेची अस्थायी समिती कारवाई करणार असे पत्रात नमूद केले आहे.
भारतीय शैली कुस्ती महासंघ व भारतीय कुस्ती संघ, हे दोन वेगवेगळे देशस्तरीय कुस्ती संघ आहेत. हिंदकेसरी हे टायटल वापरण्याचा अधिकार भारतीय शैली कुस्ती महासंघाला आहे.

Stay Connected

1,567FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या