27.4 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeक्रीडाआफ्रिदीची गंभीरवर चिखलफेक; भज्जीच्या प्रतिक्रियेने चाहते संतापले

आफ्रिदीची गंभीरवर चिखलफेक; भज्जीच्या प्रतिक्रियेने चाहते संतापले

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : टीम इंडियाने आशिया कप २०२२ मध्ये आपल्या मोहिमेची शानदार सुरुवात केली. दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर रविवारी झालेल्या सामन्यात भारतीय संघाने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा ५ विकेट राखून पराभव केला. पाकिस्तानविरुद्धच्या विजयात हार्दिक पांड्याने केलेल्या शानदार कामगिरीबद्दल त्याला सामनावीराचा किताब देण्यात आला. पण या सामन्यापूर्वी शाहिद आफ्रिदीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो टीव्ही शोमध्ये भारतीय संघाचा माजी खेळाडू गौतम गंभीरची खिल्ली उडवताना दिसला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हरभजन सिंगही त्याच्या या कृतीवर हसताना होता. हे पाहिल्यानंतर सोशल मीडियावरही चाहत्यांचा राग उफाळून आला.

गौतम गंभीर आणि शाहिद आफ्रिदी यांच्यातील शब्दयुद्ध खूप जुने आहे. आफ्रिदी आणि गंभीर २००७ मध्ये कानपूरमध्ये खेळल्या गेलेल्या एकदिवसीय सामन्यात भिडले होते. या घटनेनंतर गंभीर आणि आफ्रिदी अनेकदा सोशल मीडियावर एकमेकांना टोमणे मारताना दिसले आहेत. क्रिकेट असो की राजकीय, दोघे एकमेकांचा अपमान करण्याची एकही संधी सोडत नाहीत. भारतातील एका टीव्ही चॅनलशी बोलताना आफ्रिदी म्हणाला की, मला भारतातील कोणत्याही खेळाडूशी भांडणे आवडत नाही. ट्विटरवर गौतम गंभीरसोबत अनेकदा वाद होत असतात. गौतम गंभीर हा असा माणूस आहे जो टीम इंडियाच्या कोणत्याही खेळाडूला आवडत नाही.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या