30.6 C
Latur
Friday, May 14, 2021
Homeक्रीडाशेवटी क्रिकेट हा खेळ आहे; शाहरुखच्या नाराजीवर रसेलचे उत्तर

शेवटी क्रिकेट हा खेळ आहे; शाहरुखच्या नाराजीवर रसेलचे उत्तर

एकमत ऑनलाईन

चेन्नई : मुंबई इंडियन्स विरुद्ध मंगळवारी झालेल्या लढतीमध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा १० रनने पराभव झाला. केकेआरच्या बॅट्समनने शेवटच्या पाच ओव्हरमध्ये खराब खेळ केल्यानं त्यांच्या हातातून मॅच निसटली. टीमच्या या पराभवावर केकेआरचा सहमालक शाहरुख खान याने नाराजी व्यक्त केली होती. त्याच्या नाराजीला केकेआरचा ऑल राऊंडर आंद्रे रसेलने उत्तर दिले आहे.

आपल्या टीमने अत्यंत निराशाजनक कामगिरी केली. मी टीमच्या वतीने सर्व केकेआर चाहत्यांची माफी मागतो. अशा आशयाचे ट्विट करुन शाहरुखने आपली नाराजी व्यक्त केली आहे. त्याचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

काय म्हणाला रसेल?
माझा शाहरुख खानच्या ट्विटला पाठिंबा आहे. पण मॅच संपपर्यंत तुम्ही निर्धास्त होऊ शकत नाही. शेवटी क्रिकेट हा खेळ आहे. मला अजूनही विश्वास आहे. आम्ही चांगला खेळ केला. मला आमच्या खेळाडूंचा अभिमान आहे. आम्ही नक्कीच निराश झालो आहोत हे तुम्हाला माहिती आहे. पण अजून जग संपलेले नाही. ही फक्त दुसरी मॅच होती. यामधून आम्ही नक्की धडा घेऊ. अशी प्रतिक्रिया रसेलनं दिली आहे. रसेल मुंबई विरुद्ध बॅट्समन म्हणून अपयशी ठरला. मात्र त्याने बॉलिंगमध्ये जबरदस्त कामगिरी केली होती. त्याने फक्त २ ओव्हर बॉलिंग करत मुंबई इंडियन्सची निम्मी टीम आऊट केली.

मुंबईच्या १५३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाताचे सलामीवीर शुबमन गिल आणि नितीश राणा यांनी दमदार सुरुवात केली होती. या दोघांनी ७२ धावांची सलामी भागीदारी रचली. हे दोघेच कोलकाताच्या विजयाचा पाया रचणार असे वाटत असताना राहुल चहरने गिलला ३३ धावांवर बाद केलं. त्यानंतर चहरनं ईऑन मॉर्गन (७), राहुल त्रिपाठी (५) यांनाही पॅव्हेलियनचा मार्ग दाखवला. ह्याणा बाद झाल्यानंतर मुंबईच्या गोलंदाजांनी आपला फास अधिकच आवळला. शेवटच्या दोन षटकात बुमराह आणि बोल्टने टिच्चून गोलंदाजी केली. शेवटच्या षटकात १५ धावांची गरज असताना बोल्टने रसेल आणि कमिन्स यांना बाद केले. आणि मुंबईनं यंदाच्या हंगामातील आपला पहिला विजय नोंदवला.

हिंगोलीत दुचाकी चोर मामा, भाच्यांचा धुमाकूळ

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,495FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या