20.9 C
Latur
Tuesday, November 29, 2022
Homeक्रीडारोहितनंतर विराटसुद्धा दुखापतग्रस्त

रोहितनंतर विराटसुद्धा दुखापतग्रस्त

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : इंग्लंडविरुद्धच्या सेमीफायनल सामन्यापूर्वी टीम इंडियाचे टेन्शन वाढले आहे. कारण टीम इंडियाला पुन्हा दुखापतीचे ग्रहण लागलेले दिसत आहे. टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली जखमी झाला आहे. नेटचा सराव करताना हर्षल पटेलचा चेंडू विराट कोहलीच्या मांडीवर लागला. वृत्तानुसार, विराट कोहलीला खूप दुखापत झाली असून तो नेट प्रॅक्टिस अर्धवट सोडून मैदानाबाहेर गेला आहे.

काल नेटमध्ये सरावादरम्यान रोहित शर्माच्या उजव्या हाताला दुखापत झाली. आता विराट कोहली नेट सराव करत असताना हर्षल पटेलच्या एका वेगवान चेंडूने विराट कोहलीच्या मांडीला दुखापत झाली आहे.

दुखापतीनंतर विराट कोहली मैदानाबाहेर गेला. विराट कोहलीच्या दुखापतीबाबत अद्याप फारशी माहिती समोर आलेली नाही. संघ व्यवस्थापनाकडून विराट कोहलीबाबतचे अपडेट लवकरच जारी केले जाऊ शकते.

विराट कोहलीची दुखापत टीम इंडियासाठी मोठा धक्का असू शकते. विराट कोहली भारतासाठी या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे.

टीम इंडियाने गटात अव्वल स्थान पटकावत उपान्त्य फेरीत धडक मारली त्यामागे कुठे ना कुठेतरी विराट कोहलीचा हात आहे. विराट कोहलीची दुखापत जर मोठी असेल तर टीम इंडियाला मोठा दणका बसू शकतो. याआधी मंगळवारी कर्णधार रोहित शर्मालाही नेट सराव करताना दुखापत झाली होती. मात्र, काही वेळाने रोहित शर्मा मैदानात परतला.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या