34.3 C
Latur
Tuesday, April 20, 2021
Homeक्रीडाकसोटी मालीकेनंतर पाहुणे टी ट्वेंटीतही चीतपट

कसोटी मालीकेनंतर पाहुणे टी ट्वेंटीतही चीतपट

एकमत ऑनलाईन

अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडीयमवरील इंग्लंडबरोबर झालेला पाचवा आणि अंतिम टी२० सामना भारताने ३६ धावांनी जिंकला. या विजयासह यजमानानी टी२० मालिकाही ३-२ अशा फरकाने जिंकली. या सामन्यापूर्वी मालिकेत २-२ अशी बरोबरी होती. त्यामुळे पाचवा सामना निर्णायक होता. या निर्णायक सामन्यात विजय मिळवत भारताने सलग ६ वा टी२० मालिका विजय मिळवला. पाहुण्यांनी नाणेफेक जिंकल्यानंतर कर्णधारा सह सर्वजण एकदम खूष होते भारतीय गोटात मात्र थोडीशी नाराजी होती कारण टी ट्वेन्टी च्या सांमण्यात धावांचे टारगेट पूर्ण करणे सोपे जाते.

पाहुण्यांनी प्रथम फलंदाजी करायची संधी यजमानांना दिली प्रथम फलंदाजी करताना भारताने अठराव्या षटकापर्यंत २ बाद १९३ धावा फलकावर नोंदवल्या. कर्णधार विराट कोहली आणि हार्दिकची जोडी मैदानावर टिकून होती. अखेरच्या २ षटकात अधिकाधिक धावा जोडण्याच्या प्रयत्नात हार्दिकने आक्रमक रवैय्या अंगिकारला. जॉर्डनच्या पहिल्याच चेंडूवर डिप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला खणखणीत षटकार मारला.त्यानंतर पुढील दुसऱ्या चेंडूवरही हार्दिकने मिड विकेटवर उत्तुंग षटकार ठोकला. त्याच्या जबरा फलंदाजीला पाहून डगआउटमध्ये बसलेले भारतीय संघाचे कर्मचारी आणि खेळाडू जागचे उठून त्याचे टाळ्यांसह त्याचे कौतुक करू लागले. दुसरीकडे स्टेडियममध्ये उपस्थित असलेली नताशाही जागची उठली आणि मोठमोठ्याने टाळ्या वाजवू लागली हार्दिकने विराटसोबत सामन्याखेर नाबाद राहत संघाला २०० पार धावा उभारण्यात मोलाचा वाटा उचलला.

त्याने १७ चेंडूत नाबाद ३९ धावांची खेळी केली. यात त्याच्या २ षटकार आणि ४ चौकारांचा समावेश होता.भारताकडून रोहित शर्माने ६४ आणि विराट कोहलीने नाबाद ८० धावांची अर्धशतकी खेळी केली. त्यानंतर सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्यानेही आपल्या बँटा परजून घेतल्या सुर्यकुमार यादवने ३२ आणि हार्दिक पंड्याने ३९ धावांची आक्रमक खेळी केली. त्यामुळे इंग्लंडची गोलंदाजी पारच ढेपाळलीयजमानानी प्रथम फलंदाजी करताना २० षटकात २ बाद २२४ धावा करता आल्या पाहुण्यांना१२०चेंडूत २२५ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना पाहुण्यांना २० षटकात ८ बाद १८८ धावाच करता आल्या. डावाच्या दुसऱ्याच चेंडूवर भूवीने रॉयचा त्रिफळा उध्वस्त केला त्यानंतर पाहुण्यांकडून जोस बटलर(५२) आणि डेव्हिड मलानने(६८) यांनी केलेल्या फटकेबाजीमुळे एकवेळ इंग्लंडची आशा कायम होत पण ही जोडी फुटली जोडी फोडण्याचे काम मात्र पुन्हा एकदा भूवनेश्वरनेच केले या जोडीने बारा षटकात १३० धावांची झंझावाती भागीदारी केली त्यांच्या तडाख्यातून एकही गोलंदाज सुटला नाही मात्र, अन्य फलंदाजांना फार काही करता आले नाही.

या वेळीही पंधराव षटक निर्णायक ठरले एका षटकात शार्दुल ठाकूरने प्रथम जाँन बेअरस्टोव्हला बाद केले त्यानंतर एका चेंडू नंतर घणाघाती खेळी करणारा डेव्हिड मलानचा त्रिफळा उध्वस्त केला तेराव्या षटकानंतर पाहुण्यांची धावसंख्या एक बाद १३० अशी सुस्थितीत होती पण सोळाव्या षटकानंतर पाहुणे पाच बाद१४२ असे घसरले पाहुण्यांनी नऊ चेंडूत 12 धावा करताना चार गडी गमावले त्यानंतर मात्र फक्त औपचारिकता राहिली .गेल्या सामन्याप्रमाणेच शार्दुल ठाकूरने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तसेच भुवनेश्वर कुमारने चार षटकांत १५ धावा देत २ विकेट्स घेतल्या. सामनावीरचा पुरस्कार त्यांला देण्यात आला हार्दिक पंड्या आणि टी नटराजनने प्रत्येकी १ विकेट घेतली.

खरे तर यजमानानी धावांचा पाऊस( १८चौकारव११षटकाराचा)पाडल्याने गोलंदाजांना भरपूर मार्जिन मिळाले यजमानाकडून सहा गोलंदाज खेळवले गेले पाहुण्यांच्या धावसंख्येत २० धावा अवांतर होत्या.त्यात ११ वाईडबाँल म्हणजे जवळजवळ दोन षटके पाहुण्यांना जास्त फलंदाजी करता आली तरीही यजमानांना विजय मिळवण्यास त्रास झाला नाही आगामी ती ट्वेंटी विश्वचषकाच्या तयारी करताना यजमानांना गोलंदाजांच्या दिशा व टप्पा अचूक असण्यावर निश्चितच काळजी करावी लागेल. विराटने मालिका विजयाची ट्रॉफी स्विकारल्यानंतर ती सुर्यकुमार यादव आणि इशान किशन यांच्या हाती सोपवली. त्यानंतर त्यांनी ती ट्रॉफी वर उंचावली.

डॉ.राजेंद्र भस्मे

परभणी जिल्हा बँकेसाठी 97.14 टक्के मतदान

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,478FansLike
169FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या