29.2 C
Latur
Sunday, February 28, 2021
Home क्रीडा अजिंक्य रहाणे मुंबईत दाखल

अजिंक्य रहाणे मुंबईत दाखल

एकमत ऑनलाईन

मुंबई : ऑस्ट्रेलिया दौरा गाजवून कर्णधार अजिंक्य रहाणे गुरुवारी मुंबईत दाखल झाला. मुंबईच्या माटुंगा येथील घरात त्याचे जंगी स्वागत करण्यात आले. दोन-अडीच महिने मुलगी आर्यापासून दूर असलेल्या अजिंक्यने सगळ्यात आधी तिला मिठी मारली. ढोल-ताशा, तुतारी, फुलांची उधळण, रेड कार्पेट असे दणक्यात अजिंक्यचे स्वागत करण्यात आले. यावेळी अजिंक्यने त्याची पत्नी राधिकाने दिलेल्या खास सूचनेची माहिती सांगितली. मुंबईत येशील तेव्हा चांगले कपडे घालून ये, अशी सूचना राधिकाने अजिंक्यला केली होती. ती का केली होती, याची कल्पना मात्र अजिंक्यला मुंबईत दाखल झाल्यानंतर आली.

ऑस्ट्रेलियाच्या कसोटी मालिकेत अजिंक्यने त्याचे नेतृत्व कौशल्य जगाला दाखवून दिले. दुखापतग्रस्त खेळाडूंची वाढत चाललेली यादी पाहूनही तो डगमगला नाही, उलट नव्या दमाच्या सहका-यांना घेऊन कांगारूंशी भिडला. रुपारेल कॉलेजसमोरील इमारतीत अजिंक्यसाठी रेड कार्पेट अंथरण्यात आले होते… दोन महिन्यांहून अधिक काळ लेकीपासून दूर असलेल्या अजिंक्यने मुलीची गळाभेट घेतली तो क्षण भावनिक करणारा ठरला… ढोल-ताशांच्या गजरात अजिंक्यचे स्वागत केले गेले. यावेळी अजिंक्यने एक किस्सा सांगितला… तो म्हणाला, राधिका म्हणाली चांगले कपडे घालून ये, मला वाटलं काय फरक पडतो, आर्या तुला बघून खुश होईल असं ती म्हणाली. इथे आल्यावर सरप्राईज मिळाले आणि खूप आनंद वाटतोय. भारताच्या विजयाचे श्रेय सर्वांचे आहे. यावेळी अजिंक्यने सोसायटीतील सदस्यांचेही आभार मानले.

नवोदयाची आशा !

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,438FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या