24.7 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeक्रीडाअजिंक्य रहाणे आता आयपीएलमधून बाहेर

अजिंक्य रहाणे आता आयपीएलमधून बाहेर

एकमत ऑनलाईन

मुंबई : प्लेऑफपर्यंत पोहोचण्यासाठी संघांची चुरस लागलेली असताना कोलकाता नाईट रायडर्सची चिंता वाढली आहे. या संघातील दिग्गज फलंदाज अजिंक्य राहणे दुखापतीमुळे बायोबबल सोडून आयपीएलमधून बाहेर पडला आहे. उर्वरित सामन्यात तो खेळणार नसून मिळालेल्या माहितीनुसार त्याच्यावर बंगळुरु येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये उपचार करण्यात येणार आहेत. अजिंक्य रहाणेने दुखापतीमुळे आयपीएलमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. १४ मे रोजी हैदराबादविरोधातील सामन्यात फलंदाजीदरम्यान त्याच्या पायाला दुखापत झाली होती. तरीही तो खेळला होता. मात्र त्याच्या पायाला आता त्रास जाणवत आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या