25 C
Latur
Wednesday, August 10, 2022
Homeक्रीडाअकमलचा बकरा गेला चोरीला

अकमलचा बकरा गेला चोरीला

एकमत ऑनलाईन

लाहोर : पाकिस्तानचा यष्टीरक्षक फलंदाज कामरान अकमल पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आता कामरान अकमलच्या घरातून बकरा चोरीला गेला आहे. त्याने हा बकरा बकरी ईदनिमित्त कुर्बानी देण्यासाठी विकत घेतला होता. या बक-यासोबत अजून पाच बकरे देखील खरेदी करण्यात आले होते. मात्र ईदच्या दोन दिवस आधीच त्याच्यातील एका बक-याची चोरी झाली. यंदाची बकरी ईद १० जुलैला साजरी करण्यात येणार आहे.

अकमलच्या कुटुंबियांनी एक दिवस आधी कुर्बानीसाठी सहा बकरे आणले होते. लाहोरमधील आपल्या खासगी हाऊसिंग सोसायटीच्या बाहेर हे बकरे बांधण्यात आले होते. याची राखणदारी करण्याची जबाबदारी सोसायटीच्या सुरक्षा रक्षकावर सोपवण्यात आली होती. मात्र रात्री ३ वाजता सुरक्षा रक्षकाला झोप लागली. त्यादरम्यान चोरट्यांनी अकमलचा एक बकरा चोरला.

दरम्यान, अकमलचे वडील मोहम्मद अकमल यांनी दिलेल्या माहितीनुसार इतर सहा बक-यांपैकी चोरीला गेलेला बकरा सर्वांत चांगला होता. त्याची किंमत तब्बल ९० हजार रुपये होती. अकमल परिवाराला त्यांचा चोरीला गेलेला बकरा शोधून आणण्याचे आश्वासन त्यांच्या हाऊसिंग सोसायटीच्या सुरक्षा रक्षकाने दिले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या