27 C
Latur
Saturday, February 27, 2021
Home क्रीडा अमितजी तुम्ही लवकर बरे व्हावे यासाठी प्रार्थना -शोएब अख्तर

अमितजी तुम्ही लवकर बरे व्हावे यासाठी प्रार्थना -शोएब अख्तर

एकमत ऑनलाईन

मुंबई : कोरोना व्हायरस शनिवारी रात्री महानायक अमिताभ बच्चन यांच्या घरापर्यंत पोहोचला आणि एकच खळबळ उडाली. अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांना कोरोनाची लागण झाल्याचं त्यांनी स्वत: शनिवारी ट्वीटरवरुन सर्वांना सांगितलं. अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाली कळताच, देश-विदेशातून ते लवकर बरे व्हावे यासाठी त्यांचे फॅन्स प्रार्थना करु लागलेत. अनेकांनी सोशल मीडियावर बिग बी लवकरच कोरोनावर मात करुन चाहत्यांसमोर येतील ही सदिच्छा व्यक्त केली.

पाकिस्तानचा माजी जलद गोलंदाज शोएब अख्तरनेही अमिताभ बच्चन यांच्यासाठी प्रार्थना केली. पाकिस्तानातील तुमचे चाहते तुमच्यासाठी प्रार्थना करतायेत असं शोएबने म्हटलं. शोएब अख्तरने अमिताभ बच्चन यांचं ट्वीट रिट्वीट करत म्हटलं की, “अमितजी लवकर बरे व्हा. तुम्ही लवकर बरे व्हावे यासाठी प्रार्थना.”

Read More  बच्चन कुटुंबियांसाठी उज्जैनच्या मंदिरात चाहत्यांनी केली पूजा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,434FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या