28 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeक्रीडापुण्यातील अनाथ मुलगी आज बनली ऑस्ट्रेलियाची कॅप्टन

पुण्यातील अनाथ मुलगी आज बनली ऑस्ट्रेलियाची कॅप्टन

एकमत ऑनलाईन

पुणे : नियती आणि नशिबापेक्षा कोणी मोठे नसते. एखादी गोष्ट नियतीच्या मनात असेल, तर ती घडून राहते. राजाच्या घरात जन्माला येऊनही, एखादी व्यक्ती कमनशिबी ठरते. पण तेच रस्त्यावर जन्मलेले एक अनाथ मुलही मोठे इतिहास घडवून जाते. जेव्हा आपल्याला हे समजते, तेव्हा नियती आणि नशिबाच्या पुढे काही चालत नाही, ही गोष्ट आपल्या लक्षात येते.

पुण्यासारख्या मोठ्या शहराच्या एका कोपऱ्यात जन्मलेल्या अनाथ मुलीची ही गोष्ट आहे. कारण जन्मानंतर आई-वडिलांनी अडचणींमुळे तिला शहरातील अनाथालयात सोडलं होतं. पण नियतीने या मुलीच्या नशिबात काहीतरी वेगळच लिहून ठेवलं होतं. आज या मुलीला जन्म देणारे आई-वडील आतल्या आत भरपूर रडत असतील, कारण ते आज जन्म दिलेल्या मुलीला भेटू शकत नाहीत. ही गोष्ट आहे, ऑस्ट्रेलियाचा प्रसिद्ध यशस्वी क्रिकेटपटू लीजा स्टालगरची.

१३ ऑगस्ट १९७९ रोजी पुणे शहरातील एका छोट्याशा कोपऱ्यात लीजाचा जन्म झाला. लीजाचा स्वीकार करणं, तिच्या आई-वडिलांना शक्य नव्हतं, ही मुलगी म्हणजे आपल्यासाठी अडचण आहे, असं त्यांना वाटलं. त्यामुळे सकाळी-सकाळी त्यांनी पुण्यातील श्रीवास्तव अनाथालयात या मुलीला सोडलं. अनाथालयाने या गोंडस मुलीचं लैला असं नामकरण केलं.

त्या दिवसांमध्ये हरेन आणि सू नावाचं एक अमेरिकन जोडपं देश भ्रमंती करण्यासाठी भारतात आलं होतं. या जोडप्याला पहिल्यापासून एक मुलगी होती. भारतात एका मुलाला दत्तक घेण्याच्या उद्देशाने हे जोडपं इथे आलं होतं. ते सुंदर मुलाच्या शोधात आश्रमात आले. त्यान मनासारखा मुलगा मिळाला नाही. त्यावेळी सू ची नजर लैलावर पडली. त्या मुलीच्या निरागस चेहरा आणि आकर्षक डोळ्यांनी हरेन आणि सू ला तिच्या प्रेमात पाडलं. कायदेशीर प्रक्रियेनंतर त्यांनी लैलाला दत्तक घेतलं. सू ने लैलाच नाव बदलून लीज केलं. ते पुन्हा अमेरिकेला निघून गेले. काही वर्षानंतर हे जोडपं ऑस्ट्रेलिया सिडनी येथे स्थायिक झालं.

हरेनने लीजला क्रिकेट खेळायला शिकवलं. घरातील पटांगणातून लीजने क्रिकेट सुरु केलं. नंतर पुढ जाऊन ती गल्लीतल्या मुलांसोबत क्रिकेट खेळू लागली. लीजला क्रिकेटचा प्रचंड वेड होतं. पण तिने तिच्या शिक्षणाला देखील तितकच महत्त्व दिलं. लीजने अभ्यासाबरोबर क्रिकेट प्रशिक्षण सुरु ठेवलं. पुढे तिने ऑस्ट्रेलियातील स्थानिक क्रिकेट स्पर्धांमध्ये खेळायला सुरुवात केली. आता लीजपेक्षा तिची बॅटच जास्त बोलत होती. पुढे जाऊन तिने ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रीय संघात स्थान मिळवलं, अनेक रेकॉर्ड आपल्या नावावर केले.

प्रत्येक माणूस आपलं नशीब घेऊन जन्माला येतो. आई-वडिलांनी तिला अनाथालयात सोडलं. नियती तिला अमेरिकेत घेऊन गेली. हीच लीज ऑस्ट्रेलियाची कॅप्टन बनली. आज जगातील महान महिला क्रिकेटपटूंमध्ये तिची गणना होते.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या