27 C
Latur
Saturday, August 13, 2022
Homeक्रीडाभालाफेकीत अन्नू राणी पोहोचली फायनलमध्ये

भालाफेकीत अन्नू राणी पोहोचली फायनलमध्ये

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : भारताची महिला भालाफेकपटू अन्नू राणी सलग दुस-यांदा वर्ल्ड अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचली आहे. अन्नूने शेवटच्या प्रयत्नात ५९.६० मीटर भालाफेक करत अंतिम फेरी गाठली.

अन्नूने आपल्या पहिल्याच प्रयत्नात फाऊल केला. तर दुस-या प्रयत्नात ५५.३५ मीटर भाला फेकला. त्यामुळे तिचे आव्हान संपुष्टात येण्याची चिन्हे दिसत होती. मात्र तिस-या प्रयत्नात ५९.६० मीटर भाला फेकून तिने आपले आव्हान जिवंत ठेवले.

तिस-या प्रयत्नात तिचा भाला ६० मीटर मार्कच्या फक्त ४० सेंटिमीटर मागे राहिला. ती पात्रता फेरीत ग्रुप बी मध्ये पाचव्या स्थानावर राहिली. पात्रता फेरीतील दोन गटांतून सर्वोत्तम आठ भालाफेकपटू अंतिम फेरीसाठी निवडले गेले. त्यात अन्नूने स्थान पटकावले.

२९ वर्षीय अन्नू राणीच्या नावावर भालाफेकीत राष्ट्रीय विक्रमाची नोंद आहे. मात्र तिला वर्ल्ड अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये ६० मीटरचा मार्क गाठण्यात अपयश आले आहे. आता राणीला शनिवारी होणा-या अंतिम फेरीत आपल्या खेळात सुधारणा करावी लागणार आहे. तिची ६३.८२ मीटर ही वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी आहे. ज्या भालाफेकपटूंनी ६२.५० मीटरचा मार्क पार केला आहे ते थेट फायनलसाठी पात्र झाले. असे तीनच खेळाडू थेट पात्र झाले आहेत.

अन्नू सलग दोन वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये सहभागी होणार आहे. अन्नू राणीची ही तिसरी वर्ल्ड अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप आहे. ती २०१९ साली दोहा येथे झालेल्या वर्ल्ड अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत ६१.१२ मीटर भालाफेक करत अंतिम फेरीत आठव्या स्थानावर राहिली होती.

ती २०१७ च्या वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी पात्र झाली नव्हती. अन्नूच्या नावावर ६३.८२ मीटर भालाफेकीचा राष्ट्रीय विक्रम आहे. मे महिन्यात जमशेदपूर येथे झालेल्या इंडियन ओपन भालाफेक स्पर्धेत तिने सुवर्ण पदक पटकावत राष्ट्रीय विक्रम केला होता.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या