28 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeक्रीडाअनुष्काला येतेय विराटची आठवण

अनुष्काला येतेय विराटची आठवण

एकमत ऑनलाईन

मुंबई : बॉलिवूडची स्टार अभिनेत्री अनुष्का शर्मा तिचा आगामी चित्रपट ‘चकदा एक्सप्रेस’च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. सध्या लंडनमध्ये या चित्रपटाची शूटिंग सुरू आहे. याचदरम्यान, अनुष्काला तिचा पती आणि भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीची आठवण येत असून त्याच्यासाठी तिने सोशल मीडियावर एक इमोशनल पोस्ट केली आहे.
अनुष्का आणि विराटच्या जोडीची चर्चा सर्वत्र रंगली आहे.

दोघेही सोशल मीडियावर एकमेकांसाठी काहीतरी खास पोस्ट करत असतात. अनुष्का शर्मा तिच्या आगामी ‘चकदा एक्सप्रेस’ चित्रपटाच्या शूटिंगसाठी सध्या लंडनमध्ये आहे. तर, विराट कोहली ऑस्ट्रेलियाविरुद्ध उद्यापासून खेळल्या जाणा-या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी भारतात आहे. नुकतीच अनुष्का शर्माने विराट कोहलीसाठी अशीच एक पोस्ट केली आहे. अनुष्काची ही पोस्ट पाहून असं समजतंय की, ती सध्या विराटला खूप मिस करत आहे.

अनुष्काने इन्स्टाग्रामवर विराटसोबतचा एक फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये ‘जग अधिक उजळ, मनोरंजक आणि मजेदार दिसतं जेव्हा तुम्ही एका खास व्यक्तीसह हॉटेल बायो-बबलमध्ये असता’ असं लिहिलंय.
भारताची वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामीच्या जीवनावर आधारित ‘चकदा एक्सप्रेस’ या चित्रपटाची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. या चित्रपटात अनुष्का शर्मा झुलन गोस्वामीची भूमिका साकारणार आहे. प्रोसित रॉय या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असून हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या