22.4 C
Latur
Saturday, June 19, 2021
Homeक्रीडाअर्जन नागवासवालाची अखेर भारतीय संघात निवड

अर्जन नागवासवालाची अखेर भारतीय संघात निवड

एकमत ऑनलाईन

मुंबई : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आणि इंग्लंड दौ-यासाठी केलेल्या भारतीय संघाच्या निवडीत उदयोन्मुख खेळाडू अर्जन नागवासवालाला संधी मिळाली. यंदा प्रथम श्रेणीच्या सामन्यात अनेक फलंदाजांना तंबुचा रस्ता दाखवून गुजरातला विजय हजारे करंडक स्पर्धेच्या उपांत्य फेरीपर्यंत पोचविण्यात मोलाची कामगिरी बजावलेल्या अर्जनला आयपीएलमध्ये मात्र स्वत:ला विकता आले नव्हते. मात्र त्याला अखेर इंग्लंड दौ-यासाठी संधी मिळाल्याने त्याच्या कष्टाचे चीज झाले आहे.

अर्जन फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये गुजरातचे प्रतिनिधित्व करतो. अर्जनने आयपीएलच्या १४ व्या मोसमाच्या लिलावसाठी अर्ज केला होता. अर्जनची बेस प्राईज २० लाख होती. मात्र त्यानंतरही अर्जन अनसोल्ड राहिला. अर्जनने आयपीएलच्या आधी सय्यद मुश्ताक अली स्पर्धेतील ५ सामन्यात ९ बळी घेतले होते. तसेच विजय हजारे स्पर्धेतील ७ सामन्यात १९ बळी घेतले होते. अर्जनच्या गोलंदाजीच्या जोरावर गुजरात उपांत्य फेरीत पोचले होते. अर्जनने २०१९-२० च्या मोसमात ८ सामन्यात ४१ बळी पटकावले होते. आतापर्यंत १६ प्रथम श्रेणीच्या सामन्यात ६२ बळी घेतले आहेत.

पृथ्वीला वगळल्याने नेहराचा संताप
भारतीय संघात धडाकेबाज बॅट्समन पृथ्वी शॉ ला स्थान दिलेले नाही. यावरुन भारतीय संघाचा माजी दिग्गज गोलंदाज आशिष नेहराने निवड समितीवर टीकास्त्र सोडले आहे. ऐन फॉर्मात असलेल्या पृथ्वी शॉ ला संघात का स्थान दिले नाही?, असा थेट सवाल नेहराने विचारला आहे. बॅटिंग तंत्राच्या मुद्द्यावर बोलायचे म्हटल्यास वाद प्रतिवाद होऊ शकतात. कधीकधी बॅट्समनला नव्या वातावरणाशी जुळवून घ्यायला वेळ लागतो. ऑस्ट्रेलिया दौ-यात अ‍ॅडलेडमध्ये पृथ्वी शॉ युवा खेळाडू होता. त्याची सुरुवात होती. एका मॅचवरुन तुम्ही पृथ्वीला जज करु शकत नाही किंबहुना संघातून वगळू शकत नाही, अशा शब्दात नेहराने संताप व्यक्त केला आहे.

ऑगस्ट २०२१ मध्ये ब्रिटन होणार कोरोनामुक्त

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
203FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या