23.6 C
Latur
Tuesday, October 4, 2022
Homeक्रीडाअर्जुन तेंडुलकर मुंबईचा संघ सोडणार

अर्जुन तेंडुलकर मुंबईचा संघ सोडणार

एकमत ऑनलाईन

मुंबई : भारताचा माजी क्रिकेटपटू मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने त्याच्या क्रिकेट करिअरबाबत मोठा निर्णय घेतला आहे. अर्जुन तेंडुलकर पुढील रणजी हंगामापूर्वी मुंबई संघ सोडण्याच्या तयारीत आहे.

त्यासाठी अर्जुनने मुंबई क्रिकेट असोसिएशनकडे ना हरकत प्रमाणपत्र मागितले होते जे त्याला देण्यात आले आहे. त्यामुळे पुढील देशांतर्गत क्रिकेटचा सीझन तो गोव्यासाठी खेळताना दिसणार आहे. मुंबई संघाचा भाग असूनही अर्जुन तेंडुलकरला मुंबईसाठी फारसे सामने खेळायला मिळालेले नाहीत, त्यामुळेच त्याने हा निर्णय घेतला आहे.

एसआरटी स्पोर्ट्स मॅनेजमेंटने एका निवेदनात म्हटले आहे की, करिअरच्या या टप्प्यावर अर्जुनसाठी जास्तीत जास्त वेळ मैदानावर घालवणे महत्त्वाचे आहे. आम्हाला विश्वास आहे की दुस-या संघाकडून खेळल्याने अर्जुनला अधिक स्पर्धात्मक सामने खेळण्याची संधी मिळेल. तो त्याच्या क्रिकेट कारकिर्दीचे नवे पर्व सुरु करत आहे.

फिटनेस चाचणीनंतर गोवा संघात प्रवेश
गोवा क्रिकेट असोसिएशनचे सचिव विपुल फडके यांच्या माहितीनुसार, अर्जुन तेंडुलकरला गोव्यासाठी व्यावसायिक क्रिकेट खेळायचे आहे, त्यासाठी त्याच्याशी चर्चा सुरु आहे. विपुल फडके यांच्या म्हणण्यानुसार अर्जुन तेंडुलकरला एमसीएची एनओसी मिळाल्यानंतर त्याची फिटनेस चाचणी केली जाईल आणि त्यानंतर त्याला गोवा संघात प्रवेश मिळू शकेल.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या