26.2 C
Latur
Thursday, August 11, 2022
Homeक्रीडाडॅनियलसोबत अर्जुनचे डिनर

डॅनियलसोबत अर्जुनचे डिनर

एकमत ऑनलाईन

मुंबई : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर आणि इंग्लंडची महिला क्रिकेटपटू डॅनियल व्हेट यांची मैत्री खूप जुनी आहे. दोघांचे अनेकदा सोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अर्जुन सध्या लंडनमध्ये आहे.

तो डॅनियलसोबत लंडनमधील सोहो रेस्टॉरंटमध्ये जेवणासाठी गेला होता, ज्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. डॅनियल व्हेटने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर या लंचचा फोटो शेअर केला आहे.

विशेष म्हणजे, डॅनियलने २०१४ मध्ये विराट कोहलीला मध्यरात्री ट्विटरद्वारे प्रपोज केलं होतं.
सोशल मीडियावर खूप लोकप्रिय असलेल्या डॅनियल व्हेटने एका रेस्टॉरंटमध्ये जेवण करताना अर्जुनचा फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. या फोटोची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे.

त्यात अर्जुन लंच करताना दिसत आहे. व्हेट अर्जुनची खूप मोठी चाहती आहे. तिने अनेकदा त्याच्या गोलंदाजीचे कौतुक केले आहे. दिवसेंदिवस अर्जुनच्या गोलंदाजीवर खेळणे फलंदाजांसाठी अवघड जात आहे, असेही तिने म्हटले होते.

डॅनियल व्हेटची कारकीर्द
व्हेटने २०१० मध्ये आंतरराष्ट्रीय कारकीर्दीला सुरुवात केली. डॅनियल व्हेटने इंग्लंडकडून एकूण ९३ एकदिवसीय आणि १२४ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. व्हेटने एकदिवसीय क्रिकेटमध्ये १ हजार ४८९ आणि टी-२० मध्ये १ हजार ९६६ धावा केल्या आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या