22.4 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeक्रीडाआशिया चषक जिंकताच श्रीलंका संघावर पैशांचा पाऊस

आशिया चषक जिंकताच श्रीलंका संघावर पैशांचा पाऊस

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : श्रीलंका संघाने आशिया कप २०२२ च्या अंतिम सामन्यात पाकिस्तानला २३ धावांनी मात देत चषकावर नाव कोरले आहे. या विजयानंतर श्रीलंका संघाच्या खेळाडूंवर बक्षिसांचा वर्षाव झाला आहे. यावेळी त्यांचा कर्णधार दासुन शनाका याला बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने १.५० लाख डॉलर्सचा चेक दिला. तसंच सामनावीर आणि मालिकावीर ठरलेल्या खेळाडूंनाही यावेळी मोठी रक्कम मिळाली.

श्रीलंका संघाने अंतिम सामना जिंकत आशिया कप २०२२ जिंकल्यानंतर त्यांना १.५० डॉलर्स बक्षीस म्हणून मिळाले. दरम्यान दीड लाख डॉलर्स भारतीय रुपयांमध्ये विचार केल्यास १.२ कोटी इतके आहेत. तर मालिकावीर वानिंदु हसरंगा याला १५ हजार डॉलर्सचा चेक मिळाला. भारतीय रुपयांनुसार ही किंमत १२ लाख रुपये इतकी आहे.

तसंच फायनलमध्ये कमाल कामगिरी करणा-या भानुका राजपक्षे याला ५ हजार डॉलर्स तर बेस्ट कॅच ऑफ द मॅचसाठी ३ हजार डॉलर्सचा चेक मिळाला. दुसरीकडे पाकिस्तान संघाला उपविजेता म्हणून ७५ हजार डॉलर्स (भारतीय रुपयांनुसार ६०लाख रुपये) देण्यात आले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या