27.1 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeक्रीडाअश्विन खेळतोय क्लब क्रिकेट!

अश्विन खेळतोय क्लब क्रिकेट!

एकमत ऑनलाईन

मुंबई : सध्या सुरू असलेला दक्षिण आफ्रिकेचा भारत दौरा संपल्यानंतर भारतीय संघ इंग्लंच्या दौ-यावर जाणार आहे. त्या दौ-यात भारतीय संघ एक कसोटी सामना खेळणार आहे. या सामन्यासाठी एका भारतीय खेळाडूने आत्तापासूनच जोरदार तयारी सुरू केली आहे. या खेळाडूने इंग्लंड दौ-याची तयारी म्हणून क्लब क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली आहे. एखाद्या आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणात नावाजलेल्या भारतीय खेळाडूने पुन्हा क्लब क्रिकेट खेळण्याची कदाचित ही पहिलीच वेळ असावी. रविचंद्रन अश्विन असे या खेळाडूचे नाव आहे.

इंडियन प्रीमियर लीगचा १५वा हंगाम काही दिवसांपूर्वीच संपला. त्यानंतर लगेचच दक्षिण आफ्रिकेचा संघ पाच टी-ट्वेंटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी भारतात दाखल झाला. या मालिकेतून काही वरिष्ठ भारतीय खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. यामध्ये विराट कोहली, रोहित शर्मा, रविचंद्रन अश्विन या खेळाडूंचा समावेश आहे. यापैकी विराट कोहली सध्या घरीच आपल्या कुटुंबाला वेळ देत आहे तर रोहित शर्मा नुकताच मालदीव फिरून आला आहे. रविचंद्रन अश्विनने मात्र, जरा हटके पर्याय निवडला. त्याने विश्रांतीसाठी मिळालेल्या वेळेत क्लब क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. इतकेच नाही तर त्याने एका क्लबचे कर्णधारपदही स्वीकारले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या