27 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeक्रीडाअश्विनच्या गोलंदाजीत सुधारणेला वाव;   संगकाराचे मत

अश्विनच्या गोलंदाजीत सुधारणेला वाव;   संगकाराचे मत

एकमत ऑनलाईन

अहमदाबाद : फिरकीपटू रविचंद्रन अश्विन हा दिग्गज खेळाडू असून त्याने वर्षानुवर्षे दर्जेदार कामगिरी केली आहे. मात्र, त्याने अजूनही गोलंदाजीत सुधारणेबाबत आणि अधिकाधिक ऑफ-स्पिन चेंडू टाकण्याबाबत विचार केला पाहिजे, असे मत ‘आयपीएल’ संघ राजस्थान रॉयल्सचा क्रिकेट संचालक कुमार संगकाराने व्यक्त केले.

कसोटी क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक बळी (४४२) मिळवणा-या गोलंदाजांच्या यादीत दुस-या स्थानावर असलेला अश्विन गोलंदाजीत विविध प्रयोग करण्यासाठी ओळखला जातो. ‘‘अश्विन दिग्गज खेळाडू असला तरी त्याच्या गोलंदाजीत सुधारणेला नक्कीच वाव आहे.

विशेषत: ऑफ-स्पिन चेंडू अधिकाधिक कसे टाकता येतील याबाबत त्याने विचार करावा’’ असे संगकारा म्हणाला.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या