29.2 C
Latur
Sunday, February 28, 2021
Home क्रीडा घरच्या मैदानावर अश्विनचे जबरदस्त शतक

घरच्या मैदानावर अश्विनचे जबरदस्त शतक

एकमत ऑनलाईन

चेन्नईतील दुस-या कसोटीत पाहुण्यांना विजय मिळवण्यासाठी २०० षटकांत ४८२ धावा करण्याच आव्हान यजमानानी ठेवले पण तिस-या दिवसअखेर इंग्लंडचा डाव ३बाद ५३ धावा झाल्या आहेत़ त्यांना उरलेले दोन दिवस म्हणजेच १८० षटके खेळून सामना अनिर्णीत ठेवणे अशक्यच़ चौथ्या दिवशी टीम इंडियाला विजय मिळवण्यासाठी पाहुण्यांच्या सात विकेटची गरज आहे . दुसरा गडी बाद झाल्यानंतर पाहुण्यांनी नाईट वॉचमन म्हणून जँक लिचला पाठवले़ पण तोही नाईट वॉचमनचे काम करू शकला नाही़ अक्षर पटेलच्या खात्यात २ आणि अश्विनने एक बळी घेतला़तिसरा दिवस गाजवला तो कर्णधार कोहली आणि घरच्या मैदानावर शतक करणा-या अश्विनने.

त्याने विराट बरोबर ९६ धावांची भागीदारी केली तर कसोटीतील आपले पाचवे शतक झळकावले़त्याने दहाव्या विकेटसाठी मोहम्मद सिराज बरोबर ४९ धावांची भागीदारी केली़ कर्णधार विराट कोहलीने १४९ चेंडू खेळून ७ चौकारांसह महत्वपूर्ण ६२ धावा केल्या़ अश्विनला दोन-तीनदा जीवदान मिळाली पण त्यान न डगमगता फलंदाजी करत राहिला़त्याने सिडनीत आणि आणि ब्रिस्बेन मध्ये जशी जिगरबाज फलंदाजी केली त्याचाच एक उत्कृष्ट नमुना चेन्नईत पेश केला एका कसोटीत पाच विकेट आणि शतक झळकवण्याची कामगिरी तिस-यांदा करण्याचा पराक्रम अश्विनच्या नावावर जमा झाला़ कालच्या दिवसात १८ विकेट्स पडल्या तर आज भारताच्या ९आणि पाहुण्यांच्या तीन अशा एकूण बारा विकेट पडल्या ही खेळपट्टी चेंडू टणक असताना चांगली कामगिरी करत होती़

त्यावेळी इंग्लिश खेळाडूंनी पुजारा ,रोहित शर्मा, पंत, रहाणे यांना लवकर तंबूत पाठवण्याची कामगिरी केली चेंडू जुना आणि मऊ झाल्यावर मात्र खेळपट्टी फलंदाजांना मदत करत होती कर्णधार विराट कोहलीने ही सुरेख फलंदाजी केली त्याने अश्विनला बरोबर घेत भारतीय डावाला आकार दिला विराट कोहलीची खेळी चान्सलेस होती़ फक्त शेवटी तो चूकला ; अन् पायचीत झाला भारताची मधली फळी कापून काढण्यासाठी यष्टीरक्ष्क बेन फॉक्सने चांगलीच जबाबदारी पार पाडली त्याने रोहित शर्मा आणि ऋषभ पंत यांना यष्टिचित करण्यात आणि पुजाराला धावबाद करण्यात चपळाई दाखवली़ डावखु-या रिषभ पंतला रहाणेच्या पुढे बढती देऊन पाठवले रविचंद्रन अश्विन ने१४८चेंडूवर १४चौकार आणि एका षटकारासह १०६ धावा केल्या पहिल्या दिवशी रोहित शर्माने जी स्ट्रटेजी वापरली त्याच प्रमाणे अश्विनने फिरकी गोलंदाजांना रिव्हर्स स्वीप फाईन स्वीप आणि धाडसी फटके मारत शतक पूर्ण केले इंग्लिश कर्णधाराने ८० शटकानंतर नवा चेंडूसुद्धा फिरकीकडे दिला़ अकराव्या क्रमांकावर खेळायला आलेल्या मोहम्मद सिराजने अश्विनचे शतक पूर्ण झाल्यावर धडाकेबाज दोन षटकार खेचले़ खेळपट्टीवर फलंदाजी संयमाने केल्यास धावा होतात हे दाखवून दिल़पाहुण्यांच्या फिरकी गोलंदाज जँक लीच व मोइन आली यांनी चार चार भारतीय फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला़ भारतीय डावातील ८६ षटकात जलदगती गोलंदाजांचा फक्त १६ षटकांचा वाटा होता.

तिस-या दिवसाखेर इंग्लंड ३ बाद ५३
भारतीय संघाने दिलेल्या ४८२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दुस-या कसोटीच्या तिस-या दिवसअखेर इंग्लंडने ३ बाद ५३ धावांपर्यंत मजल मारली. भारताचा दुसरा डाव रविचंद्रन अश्विनच्या दमदार शतकाच्या जोरावर २८६ धावांवर संपुष्टात आला. भारताचे वरच्या फळीतील फलंदाज गोलंदाजीला मदत मिळणा-या खेळपट्टीवर स्वस्तात माघारी परतले. पण इंग्लंडच्या फिरकीपटूंचा कर्णधार विराट कोहली आणि रविचंद्रन अश्विन या दोघांनी धैर्याने सामना केला. या दोघांनी ९६ धावांची भागीदारी करत भारताच्या डावाला चांगला आकार दिला. आता सामन्यातील दोन दिवसाचा खेळ शिल्लक असून विजयासाठी इंग्लंडला ४२९ धावांची गरज आहे तर ७ गड्यांची भारताला आवश्यकता आहे.

– डॉ़ राजेंद्र भस्मे, कोल्हापूर

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,438FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या