24.8 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeक्रीडाआशिया कप, अफगाणिस्तानची विजयी सलामी

आशिया कप, अफगाणिस्तानची विजयी सलामी

एकमत ऑनलाईन

दुबई : आशिया कप २०२२ स्पर्धेला आजपासून (२७ ऑगस्ट) यूएईमध्ये सुरुवात झाली असून सलामीच्या सामन्यातच अफगाणिस्तान संघाने दमदार विजयाची नोंद केली. त्यांनी श्रीलंका संघाला ८ गडी राखून मात दिली. स्पर्धेतील सलामीच्या सामन्यातच अफगाणिस्तानने आधी अप्रतिम गोलंदाजी आणि नंतर दमदार फलंदाजीचे दर्शन घडवत पहिल्या विजयाची नोंद केली. सामन्यात आधी श्रीलंकेने १०५ धावा केल्या असताना अफगाणिस्तानने हे आव्हान १०.१ ओव्हरमध्ये पार करत विजय नोंदवला.

सामन्यात सर्वात आधी नाणेफेक जिंकत अफगाणिस्तानने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. प्रथम गोलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासून भेदक गोलंदाजी सुरू ठेवली. श्रीलंकेते फलंदाज अगदी स्वस्तात माघारी परतत होते. फजलक फारुखीने सुरुवातीपासूनच कमाल गोलंदाजी करत सर्वाधिक ३ विकेट घेतल्या. दरम्यान, श्रीलंकेच्या गुणथलिका (१७) आणि राजपक्षा (३८) यांनी काहीशी भागिदारी करत संघाचा डाव सावरला. त्याच्यानंतर करुणारत्ने याने ३१ धावांची खेळी करत संघाला किमान १०० पार पोहोचवण्यात मदत केली. इतर खेळाडूंना साधी दुहेरी संख्याही गाठता आली नाही. ज्यामुळे १०५ धावांवर श्रीलंकेचा संघ सर्वबाद झाला. यावेळी फजलक फारुखीने सर्वाधिक ३ विकेट घेतल्या, तर मोहम्मद नबी, मुजीबने प्रत्येकी २ आणि नवीन उल हकने एक विकेट घेतली.

अफगाणिस्तानचा सोपा विजय
१०६ धावांचे आव्हान पार करण्यासाठी मैदानात आलेल्या अफगाणिस्तानच्या फलंदाजांनी अगदी एकहाती विजय संघाला मिळवून दिला. सलामीवीर हजरतुल्ला जजाईने ३७, रहमनउल्लाह गुरबाजने ४० आणि इब्राहीम जद्रानने १५ नजिबउल्लाह जद्रानने दोन धावा करत संघाला ८ गडी राखून १०.१ ओव्हरमध्येच विजय मिळवून दिला. श्रीलंकेकडून हसरंगाने एक विकेट घेतली असून इतर तिघेही धावचीत झाले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या