26.1 C
Latur
Sunday, September 19, 2021
Homeक्रीडाअतानू दासची आगेकूच

अतानू दासची आगेकूच

एकमत ऑनलाईन

टोकियो : आॅलिम्पिकमधील पुरुषांच्या तिरंदाजीच्या १/३२ स्पर्धेत भारताचा अव्वल पुरुष तिरंदाज अतानू दासने चिनी तैपेईच्या आॅलिम्पिकमधील पुरुष संघाचे रौप्यपदक विजेता डेंग यू-चेंगचा ६-४ असा पराभव केला.

अतानूने १० ने सुरुवात केली आणि त्यानंतर पहिला सेट २७-२६ ने जिंकला, तर दुसरा सेट त्याने २८-२६ असा जिंकला. यानंतर डेंग यू-चेंगने ४-४ अशी बरोबरी साधली. अखेर पाचव्या आणि निर्णायक सेट अतानूने २८-२६ असा जिंकत विजयावर शिक्­कामोर्तब केला. नेमबाजीच्या पुरुष एकेरीच्या एलिमिनेशन राऊंडमध्ये भारताच्या अतानू दासने दक्षिण कोरियाच्या जिन्हा एक याच्यावर ६-५ ने मात दिली आणि पुढील फेरीत प्रवेश केला. अतानू दासने उपान्त्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे.

दीपिका कुमारी स्पर्धेबाहेर
भारताची आघाडीची महिला तिरंदाज दीपिका कुमारीचा टोक्यो आॅलिम्पिकमधील प्रवास संपुष्टात आला आहे. उपान्त्यपूर्व फेरीत दीपिकाला दक्षिण कोरियन तिरंदाज अन सानने ०-६ ने पराभूत केले. रशियन आॅलिम्पिक समितीच्या (आरओसी) केन्सिया पेरोवाचा पराभव करून दीपिकाने उपान्त्यपूर्व फेरी गाठली होती. कोरियन अन सानने पहिल्या फेरीत शानदार सुरुवात केली आणि तीन १० एस असे गुण मिळवले, तर दीपिकाने ७-१०-१० असे गुण मिळवले.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या