24.4 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeक्रीडाराहुलच्या फटकेबाजीवर अथिया झाली खुश

राहुलच्या फटकेबाजीवर अथिया झाली खुश

एकमत ऑनलाईन

मुंबई : के. एल. राहुल आणि अथिया शेट्टी यांची लव्हस्टोरी कोणापासूनही लपलेली नाही. ही जोडी नेहमीच चर्चेत असते. पहिल्या सामन्यात त्याने शानदार खेळी केली, या आनंदात अथिया शेट्टीने राहुलवर प्रेमाचा वर्षाव केला आहे.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिका खेळणा-या भारतीय संघाची सुरुवात खूपच खराब झाली होती. २०० हून अधिक धावा करूनही भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवाला भारतीय गोलंदाज आणि खराब क्षेत्ररक्षण जबाबदार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या टी-२० सामन्यात राहुलने अर्धशतक झळकावले. टीम इंडियाचा उपकर्णधार के. एल. राहुलच्या या कामगिरीवर त्याची गर्लफ्रेंड खूप खुश झाली. तिने राहुलचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला.

के. एल. राहुलने अर्धशतक पूर्ण केल्यानंतर अथिया शेट्टीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला. ज्यामध्ये के. एल. राहुल जाताना दिसत आहे. त्याचा हा फोटो शेअर करताना तिने हार्ट इमोजी शेअर केला आहे. या सामन्यात राहुलने केवळ ३५ चेंडूत ४ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ५५ धावा केल्या. डावाच्या १२ व्या षटकात के. एल. राहुलला जोश हेझलवूडने बाद केले.

तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अ‍ॅरॉन फिंचने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना २०८ धावा केल्या. टीम इंडियाकडून हार्दिक पांड्याने सर्वाधिक ७१ धावा, तर के. एल. राहुलने ५५ आणि सूर्यकुमार यादवने ४६ धावा केल्या. २०९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियन संघाने १९.२ षटकांत ६ गडी गमावून हे लक्ष्य गाठले. ऑस्ट्रेलियाकडून कॅमेरून ग्रीनने ६१ आणि मॅथ्यू वेडने नाबाद ४५ धावा केल्या.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या