27.4 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeक्रीडाशेट्टीच्या खंडाळा बंगल्यात अथिया-राहुलचे होणार शुभमंगल

शेट्टीच्या खंडाळा बंगल्यात अथिया-राहुलचे होणार शुभमंगल

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : ब-याच दिवसांपासून अथिया शेट्टी आणि के. एल. राहुलच्या लग्नाची चर्चा सुरू होती. आता अंतिम तयारी सुरू झाली आहे कारण काही महिन्यांत हे जोडपे लग्नाचे सात फेरे घेणार आहे. एवढेच नाही तर मिळालेल्या माहितीनुसार, सुनील शेट्टी आपल्या मुलीचे लग्न थाटामाटात करणार आहे.

बॉलिवूडच्या बड्या स्टार्सना बोलावण्याची योजना केली आहे. लग्नासंदर्भातील सर्वांत मोठी अपडेट म्हणजे लग्नाचे ठिकाणही निश्चित करण्यात आले आहे. अथिया आणि राहुल एका आलिशान पंचतारांकित हॉटेलमध्ये नाही तर शेट्टीच्या खंडाळा बंगल्यात लग्न करणार आहेत.

दोघांच्या कुटुंबीयांनी मिळून हा निर्णय घेतला असून राहुल लग्नाची तारीख निश्चित करेल, जी त्याच्या कामाच्या वेळापत्रकावर अवलंबून असेल. पिंक व्हिलाच्या हवाल्याने अथिया आणि राहुलच्या लग्नाचे ठिकाण फायनल झाल्याची बातमी समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्नाच्या तयारीसाठी एक सुप्रसिद्ध वेडिंग आयोजक आपल्या टीमसह खंडाळ्यात आले आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या