22.8 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeक्रीडाक्रिकेट बोर्डावर नाराज असलेल्या खेळाडूचा आत्महत्येचा प्रयत्न; प्रकृती गंभीर

क्रिकेट बोर्डावर नाराज असलेल्या खेळाडूचा आत्महत्येचा प्रयत्न; प्रकृती गंभीर

एकमत ऑनलाईन

कासिमाबाद : भारतासह आशिया खंडातील अनेक देशांत क्रिकेट हा फक्त एक खेळ नाही तर धर्म मानला जातो. यामुळेच या देशातील खेळाडू आणि चाहत्यांमध्ये क्रिकेटबद्दल कमालीचे प्रेम दिसून येते. राष्ट्रीय संघात निवड होण्यासाठी खेळाडूंमध्ये प्रचंड मोठी स्पर्धा असते. मात्र सर्वांना संधी मिळेल असे नाही आणि निराश होणा-यांची संख्या जास्त असते.

भारताचा शेजारी असलेल्या पाकिस्तानमध्ये अशीच एक घटना समोर आली आहे ज्यात क्रिकेटपटूने संघात निवड झाली नाही म्हणून आत्महत्येचा प्रयत्न केला. सिंध प्रांतातील हैदराबाद येथील कासिमाबाद येथे राहणारा शोएब हा जलदगती गोलंदाज आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून निवडण्यात आलेल्या इंटरसिटी चॅम्पियनशिपसाठीच्या संघात शोएबला संधी मिळाली नाही. यातून आलेल्या नैराश्यातून शोएबने आत्महत्येचा प्रयत्न केला. शोएबला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचे मानले जाते.

स्थानिक क्रिकेटमध्ये संधी न मिळालेला शोएब निराश झाला होता. संघ निवडीसाठी जेव्हा ट्रायल झाली तेव्हा शोएबचे कोच देखील उपस्थित होते. संघ निवडीत स्वत:चे नाव न दिसल्यावर त्याने मंगळवार, २१ जून रोजी हाताची नस कापून घेतली आणि आत्महत्येचा प्रयत्न केला.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या