29.2 C
Latur
Sunday, February 28, 2021
Home क्रीडा फेब्रुवारीत आयपीएल खेळाडूंचा लिलाव

फेब्रुवारीत आयपीएल खेळाडूंचा लिलाव

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : मुंबई इंडियन्सने दिल्लीवर मात करत सलग दुस-यांदा विजेतेपद पटकावले. तो हंगाम संपुष्टात आल्यानंतर लगेच पुढच्या हंगामाची तयारी सुरू केली होती. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात आयपीएल २०२१ साठी खेळाडूंचा लिलाव होणार हे सांगण्यात आले होते. अखेर आज आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलने लिलावाची तारीखदेखील जाहीर केली.

फेब्रुवारीच्या १८ तारखेला ही लिलाव प्रक्रिया पार पडणार असल्याची घोषणा आयपीएलने अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून केली. यंदाच्या आयपीएल लिलावाआधी प्रत्येक संघाला आपल्या संघातील कायम राखलेल्या खेळाडूंची यादी आणि करारमुक्त केलेल्या खेळाडूंची यादी बीसीसीआयकडे सुपूर्द करायची होती. त्यानुसार २० जानेवारीपर्यंत सर्व संघांनी आपल्या संघातून करारमुक्त केलेल्या खेळाडूंची यादी दिली. आता १८ तारखेला होणाºया लिलावात सर्व संघ आपल्याला हवा असलेला खेळाडू घेण्यासाठी उत्सुक आहेत.

भारतात कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे बीसीसीआयने आयपीएलच्या तेराव्या हंगामाचे आयोजन युएईमध्ये केले होते. या स्पर्धेत जे भारतीय खेळाडू करारमुक्त झाले आहेत आणि ज्यांना पुढील हंगामात आयपीएलमध्ये सहभागी व्हायचे आहे, अशा खेळाडूंनी ४ फेब्रुवारीला सायंकाळी ५ वाजेपर्यंत आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे. मूळ फॉर्म आणि इतर आवश्यक कागदपत्रे १२ फेब्रुवारीपर्यंत पोस्टाने पाठवली तरीही चालणार आहे, अशी माहिती एएनआयने दिली आहे.

उच्च न्यायालयाच्या ‘त्या’ निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,438FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या