25.5 C
Latur
Saturday, September 18, 2021
Homeक्रीडापहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व

पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व

एकमत ऑनलाईन

अ‍ॅडलेड : कर्णधार विराट कोहलीच्या अर्धशतकाच्या बळावर भारतीय संघाने पहिल्या दिवसाखेर ८९ षटकांत ६ बाद २३३ धावांपर्यंत मजल मारली आहे. वृद्धिमान साहा (९) आणि आर. अश्विन (१५) नाबाद आहेत. विराट कोहलीचा अपवाद वगळता एकाही भारतीय फलंदाजाला आपल्या लौकिकास साजेशी खेळी करता आली नाही. चेतेश्वर पुजारा (४३) आणि अजिंक्य रहाणे (४२) यांना चांगल्या सुरुवातीनंतरही मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले.

भारतीय कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, दुस-याच चेंडूवर पृथ्वी शॉ शून्य धावसंख्येवर क्लीन बोल्ड झाला. त्यानंतर मयांक अग्रवालही (१७) तंबूत परतला होता. भारतीय संघाला लागोपाठ दोन झटके बसल्यानंतर अनुभवी पुजारा आणि विराट कोहली यांनी संयमी फलंदाजी करत धावसंख्या वाढवली. मात्र, नॅथन लॉयन याने पुजाराला बाद करत जोडी फोडली. कर्णधार विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा यांनी तिस-या विकेटसाठी ६८ धावांची भागिदारी केली.

पुजारा बाद झाल्यानंतर मैदानावर आलेल्या रहाणेसोबत कोहलीने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, विराट कोहली चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात धावबाद झाला. कोहलीने ७४ धावांची अर्धशतकी खेळी केली. या खेळीदरम्यान कोहलीने ८ चौकार लगावले. कोहली बाद झाल्यानंतर रहाणेही लगेच तंबूत परतला. त्यानंतर हनुमा विहारीने (१६) आपली विकेट फेकली. पहिल्या दिवशी सामन्यावर ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचे वर्चस्व दिसून आले. स्टार्क, हेजलवडू, कमिन्स आणि लॉयन यांनी शिस्तबद्ध गोलंदाजी केली. कांगारूंच्या भेदक गोलंदाजीसमोर भारतीय संघातील फलंदाजांनी नांग्या टाकल्या. ऑस्ट्रेलियाकडून स्टार्कने दोन बळी घेतले तर हेजलवूड, कमिन्स आणि लॉयन यांनी प्रत्येकी एक-एक बळी घेतला.

आता चिनी टेलिकॉम कंपन्या केंद्राच्या रडारवर

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या