25.2 C
Latur
Wednesday, May 19, 2021
Homeक्रीडाऑस्ट्रेलियन खेळाडूंनी मायदेशी परतण्याची व्यवस्था स्वत:च करावी; पंतप्रधान मॉरिसन भूमिका

ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी मायदेशी परतण्याची व्यवस्था स्वत:च करावी; पंतप्रधान मॉरिसन भूमिका

एकमत ऑनलाईन

मुंबई : आयपीएल २०२१ मध्ये सहभागी झालेल्या ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी मायदेशी परतण्याची व्यवस्था स्वत:च करावी, अशी स्पष्ट भूमिका ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी घेतली आहे. भारतात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता अनेक देशांनी भारतातून येणाऱ्या नागरिकांवर बंदी घातली आहे. या पार्श्वभूमीवर आता ऑस्ट्रेलियानेदेखील निर्णय घेतला आहे.

ऑस्ट्रेलिया सरकारने भारतातून ऑस्टेलियाला जाणाऱ्या सर्व प्रवासी विमानांची उड्डाणे १५ मे पर्यंत रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या आधी एअर इंडियानं ब्रिटनला जाणारी आणि येणारी विमानं रद्द केली आहेत. सध्या भारतात आयपीएलचा हंगाम सुरू असून ऑस्ट्रेलियातील अनेक खेळाडू, सपोर्ट स्टाफ आणि काही नागरिक देखील भारतात दाखल आहेत. ते देखील या निर्णयामुळे भारतात अडकून राहू शकतात. त्यांना आता १५ तारखेपर्यंत ऑस्ट्रेलियाला परत जाता येणार नाही.

सध्या ऑस्ट्रेलियाचे तीन खेळाडू अँड्रयू टाय, केन रिचर्डसन आणि ऍडम झम्पा यांनी भारतातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर आयपीएलमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. तर आयपीएलमध्ये अजूनही ऑस्ट्रेलियाचे १४ खेळाडू खेळत आहेत. यात स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर, पॅच कमिन्स यांच्यासह प्रशिक्षक रिकी पाँटिंग आणि सायमन कॅटिच यांचा समावेश आहे. याशिवाय समालोचक मॅथ्यू हेडन, ब्रेट ली, मायकेल सॉल्टर आणि लिसा स्थेलकर देखील आयपीएलमध्ये समालोचन पथकाचे सदस्य आहेत.

निवडणुकीच्या विजयी मिरवणुकांवर बंदी; हाय कोर्टानं फटकारल्यानंतर निवडणूक आयोगाला निर्णय

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,498FansLike
190FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या