31.8 C
Latur
Tuesday, May 11, 2021
Homeक्रीडाकसोटीसाठी ऑस्ट्रेलियन संघ जाहीर

कसोटीसाठी ऑस्ट्रेलियन संघ जाहीर

एकमत ऑनलाईन

सिडनी : टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौ-यासाठी यूएईहून ऑस्ट्रेलियाला रवाना झाली आहे. या ऑस्ट्रेलिया दौ-याची सुरुवात एकदिवसीय मालिकेपासून होणार आहे. २७ नोव्हेंबरपासून या मालिकेला सुरुवात होणार आहे. दरम्यान ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डने टीम इंडियाविरुद्धच्या ४ कसोटी मालिकेसाठी १७ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. ऑस्ट्रेलियाने याआधी २९ आॅक्टोबरला एकदिवसीय आणि टी २० मालिकेसाठी संघ जाहीर केला आहे.

टीम पेन कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व करणार आहे. ऑस्ट्रेलियाने या १७ सदस्यीय संघात विल पुकोवस्की आणि कॅमरन ग्रीन यासह वेगवान गोलंदाज सीन एबोट, लेग स्पिनर मिचेल स्वेपसन आणि मायकल नासिर या ५ नव्या चेहºयांना संधी दिली आहे. एबोटच्या गोलंदाजीवर २०१४ मध्ये शेफिल्ड शील्ड या स्थानिक स्पर्धेदरम्यान फिलिप ह्युजचे उसळता चेंडू लागून निधन झाले होते.

आस्ट्रेलिया टेस्ट टीम : टीम पेन (कर्णधार), पॅट कमिन्स (उप कर्णधार), सीन एबोट, जो बर्न्स, कॅमरन ग्रीन, जोश हेझलवुड, ट्रेविस हेड, मार्नस लाबुशेन, नॅथन लियोन, मायकल नासिर, जेम्स पॅटिन्सन, विल पुकोवस्की, स्टीव स्मिथ, मिचेल स्टार्क, मिचेल स्वेपसन, मॅथ्यू वेड आणि डेव्हिड वार्नर.

भारतीय कसोटी संघ : विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), मयंक अग्रवाल, पृथ्वी शॉ, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, शुभमन गिल, ऋद्धीमान साहा (विकेटकीपर), ऋषभ पंत (विकेटकीपर), जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, उमेश यादव, नवदीप सैनी, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन आणि मोहम्मद सिराज

ठाकरे सरकारविरोधात जनहित याचिका दाखल

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,494FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या