34.3 C
Latur
Tuesday, April 13, 2021
Homeक्रीडातिस-या कसोटीवर ऑस्ट्रेलियाची पकड

तिस-या कसोटीवर ऑस्ट्रेलियाची पकड

एकमत ऑनलाईन

सिडनी : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिस-या कसोटीत चौथ्या दिवसअखेर सामना अतिशय रंगतदार स्थितीत आला आहे. भारताला विजयासाठी ३०९ धावांची गरज असून भारतीय संघाने दिवसअखेर २ बाद ९८ धावांपर्यंत मजल मारली आहे. आजच्या दिवसाच्या खेळात स्टीव्ह स्मिथ, लाबूशेन आणि ग्रीन यांच्या अर्धशतकांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने ३१२ धावांवर डाव घोषित केला आणि भारताला मोठे आव्हान दिले आहे. मात्र, या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने खेळ संपेपर्यंत रोहित शर्मा आणि शुभमन गिलचा बळी गमावला आहे. तर सामन्याच्या उर्वरित एका दिवसाच्या खेळात विजयासाठी भारताला ३०९ धावांची तर ऑस्ट्रेलियाला ८ बळींची आवश्यकता आहे.

सिडनीच्या तिस-या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतीय संघावर हल्लाबोल करून दुसरा डाव ६ बाद ३१२ धावांवर घोषित केला. त्यामुळे भारतीय संघाला विजयासाठी ४०७ धावांचे मोठे आव्हान दिले. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचे सलामीवीर रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी चांगली सुरुवात केली. ७१ धावांच्या भागीदारीनंतर गिल ३१ धावांवर बाद झाला तर रोहितने दमदार खेळी करत वर्षातील पहिले अर्धशतक झळकावत ५२ धावांच्या खेळीत ५ चौकार आणि १ षटकार लगावला. त्यानंतर दिवसाचा खेळ संपेपर्यंत चेतेश्वर पुजारा (९) आणि अजिंक्य रहाणे (४) या दोघांनी खेळपट्टीवर तग धरला. हेजलवूड आणि कमिन्सने १-१ बळी टिपला.

ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने मागितली माफी
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिस-या कसोटी सामन्यात क्रिकेटला काळिमा फासणारी घटना घडली आहे. भारतीय संघ क्षेत्ररक्षण करत असताना ऑस्ट्रेलियन चाहत्यांनी मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमरा यांच्याबद्दल शिवीगाळ करत आक्षेपार्ह भाषा वापरली. मैदानावर घडलेल्या या प्रकाराबाबत भारतीय क्रिकेट संघाने पंचांकडे औपचारिक तक्रार नोंदवली.भारतीय खेळाडूंच्या तक्रारीनंतर मैदानात असलेल्या सुरक्षारक्षकांनी तेथील चाहत्यांची चौकशी केली आणि अखेरीस तेथील काही चाहत्यांना तेथून उठवण्यात आले. घडलेल्या प्रकारात अजिंक्य रहाणे आणि संपूर्ण भारतीय संघ सिराजच्या पाठीशी उभा राहिल्याचे दिसल्याने सा-यांनी टीम इंडियाचे कौतुक केले.

या प्रकारानंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने अधिकृत पत्राद्वारे भारतीय संघाची माफी मागत अशा चाहत्यांची गय केली जाणार नसल्याचे सांगितले. भारतीय खेळाडूंबद्दल चाहत्यांनी केलेल्या वर्णभेदी टिप्पणीचा क्रिकेट ऑस्ट्रेलिया निषेध करते. कोणाच्याही वर्णावरून किंवा इतर गोष्टींवरून हिणवण्याच्या वृत्तीच्या आम्ही पूर्णपणे विरोधात आहोत. शनिवारी घडलेल्या प्रकाराबाबत आमचे संबंधित अधिकारी तपास करत आहेत. त्यांच्याकडून अहवाल आला की दोषींवर योग्य कारवाई केली जाईल. क्रिकेट मालिकेचे यजमान म्हणून आम्ही भारतीय संघातील खेळाडूंची बिनशर्त माफी मागतो. घडलेल्या प्रकाराचा सखोल तपास केला जाईल याची आम्ही खात्री देतो , असे पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

मुंबई पालिकेला दोन आयुक्त नकोच

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,473FansLike
162FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या